शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:37 IST

अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देरबीत हरभºयाचा पेरा वाढणार : खरिपाने दिला शेतकºयांना धोका

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. दोन वेच्यात कपाशीची उलंगवाडीचे चिन्हे दिसत असल्याने हरभºयाच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षी कापसाला प्रती किलो ४० ते ४२ रूपये भाव मिळत आहे;पण शेतकºयांना पहिल्या वेचणीला कापसाची मजूरी प्रती किलो २० रूपयेच मजूरांना द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यात इतर खर्च पकडल्यास शितदहीचा वेचा शेतकºयांना न परवडणाराच ठरला. शेतकºयांच्या दृष्टीने दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीननेही यंदा शेतकºयांना धोका दिला. अनेक शेतकºयांना यंदा समाधानकारक उतारे न आल्याचे शेतकरी सांगतात. त्यातही सोयाबीनला सध्या दिल्या जाणारा भाव शेतकºयांची अडचण वाढविणाराच आहे. सोयाबीन पीक घेतल्यानंतर जमीनीतील ओलावा हरभरा या पिकासाठी उपयुक्त ठरणारा असल्याने तसेच बोर प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी सोडण्यास विलंब दिसू लागल्याने बहुतांश शेतकºयांनी कुटुंबीयांची गरज भागविण्यापूर्ती गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तर काहींनी हरभºयाची लागवड केली आहे. परिणामी, यंदाच्या रबीत हरभºयाच्या पेºयात वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतातील कपाशी दोन वेचणीतच उलंगवाडी होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविल्या जात आहे. सिंचनासाठी धरणाचे पाणी मिळाल्यास भुईमुंगाचीही लागवड बºयापैकी होईल असेही शेतकरी सांगतात.कपाशीवरील लाल्याने वाढविली अडचणयंदा सोयाबीन व कपाशी आधार देईल, अशी आशा शेतकºयांना असताना सोयाबीनने धोकाच दिला. सध्या कपाशीवर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी शेतातच रात्रीला मुक्काम करीत असून लाल्या या रोगामुळे उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्षचशेतकºयांना शेतातील पिकांना वेळीच पाणी देता यावे या हेतूने बोर प्रकल्पाचे पाणी सोडल्या जाणार आहे. परंतु, वितरिकेची साफसफाई पाहिजे तरी न करण्यात आल्याने व त्यात काही भागात झुडपे वाढली असल्याने नियोजित वेळेत पाणी नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचेल काय याबाबत उलट-सुलट परिसरात चर्चा होत आहे. मोजक्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने वितरिका स्वच्छ करण्यात येत आहे. संपूर्ण वितरिका वेळीच स्वच्छ व दुरूस्त करण्याची मागणी आहे.सिंचनासाठी मिळणार धरणाचे पाणीबोर प्रकल्पात जलसाठा यंदा कमी असला तरी शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. यंदा केवळ हरभरा पिकासाठी तीन पाळीत पाणी सोडले जाणार असून गव्हासाठी धरणाचे पाणी दिले जाणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बोर प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असणारा गव्हाचा पेरा यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर भुर्इंमुंग पेरणी पासूनही शेतकºयांना दूर रहावे लागणार आहे.