दुचाकीची बैलगाडीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:49 IST2019-05-18T21:49:26+5:302019-05-18T21:49:57+5:30

तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमे जवळ भरधाव दुचाकीने बैल गाडीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शिवाय एक बैलही दगावला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

Two-wheeler collides with a bullock cart; One killed | दुचाकीची बैलगाडीला धडक; एक ठार

दुचाकीची बैलगाडीला धडक; एक ठार

ठळक मुद्देबैलाचा मृत्यू। एक गंभीर, नागपूर- चंद्रपूर मार्गावरील मध्यरात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमे जवळ भरधाव दुचाकीने बैल गाडीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शिवाय एक बैलही दगावला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर खांबाडा शिवारात चंद्रपूरकडून सेलू मुरपाडच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३५ एस. २१९९ क्रमांकाच्या दुचाकीने वरोडाकडे जात असलेल्या बैल गाडीला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक अश्विन लंकेश्वर पाटील (२५) याचा जागीच मृत्यू झाला तर सुशील अशोक कडू (१९) हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथील रहिवासी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यात एक बैलही गतप्राण झाल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: Two-wheeler collides with a bullock cart; One killed

टॅग्स :Accidentअपघात