अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी, भाजपचे आमदार समीर कुणावार धावले मदतीला
By महेश सायखेडे | Updated: August 16, 2022 17:19 IST2022-08-16T17:19:26+5:302022-08-16T17:19:50+5:30
आ. समीर कुणावार याच मार्गाने प्रवास करत होते. हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी आपले वाहन थांबवून तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी, भाजपचे आमदार समीर कुणावार धावले मदतीला
महेश सायखेडे -
वर्धा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही बाब हिंगणघाट येथील भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्या निदर्शनास येताच आमदारांनी आपले वाहन थांबवून जखमींना रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी सहकार्य केले. ही घटना कांढळी मार्गावर घडली.
भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने एम. एच. ३३ ए. सी. ५१६५ क्रमांकाच्या दुचाकीला धडक देत घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातात सचिन बंडोजी मंगाम (२०) व अक्षय अशोक उईके (३५) दोघेही रा. सेलडोह हे गंभीर जखमी झाले आहे. या वेळी, आ. समीर कुणावार याच मार्गाने प्रवास करत होते. हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी आपले वाहन थांबवून तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले.
दरम्यान जाम येथील महामार्ग पोलीस चौकशीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका येताच जखमी सचिन मंगाम व अक्षय उईके यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. या अपघाताची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली आहे.