शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: May 10, 2015 01:41 IST

वाहनाचा पाठलाग करून सेवाग्राम पोलिसांनी पवनार येथे चिंतामणी मंदिराजवळ देशी दारूच्या १९२..

पवनार : वाहनाचा पाठलाग करून सेवाग्राम पोलिसांनी पवनार येथे चिंतामणी मंदिराजवळ देशी दारूच्या १९२ तर विदेशी दारूच्या १२० बॉटल, एक कार, एक दुचाकी व दोन मोबाईल आदी साहित्यासह हृषीकेश कोराम (२०) व पंकज नेहारे (२५) यांना ताब्यात घेतले़ या कारवाईत दारूसह १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन ते तीन दिवसापासून सेवाग्राम पोलीस सदर गाडीवर पाळत ठेऊन होते़ मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, रात्रीच्या वेळी पंकज नेहारे हा कारमध्ये दारू घेऊन चालला होता तर हृषीकेश कोराम हा कारच्या पुढे दुचाकीने येत होता. दरम्यान आपल्या मागावर पोलीस असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यामुळे पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करीत हृषीकेशने पंकजला गाडी फिरविण्याची सूचना केली. परंतु पोलिसांच्या सर्तकतेमुळे दोघांनाही मुद्देमालासह अटक करण्यात आली. दारूबंदी महिला मंडळ स्थापन झाल्याने आधीच पवनार येथे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही प्रमाणात चोरून लपून दारू विकणे सुरूच आहे. पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे दारू बंद होण्यास मदत होईल, अशी गावात चर्चा आहे़ ऋषिकेश कोराम व पंकज नेहारे यांची आर्थिक स्थिती बघता सदर दारू ही त्यांची नसल्याचे निदर्शनास येत आहे. याप्रकरणाची कारवाई सेवाग्रामचे ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात जमादार नरेंद्र डहाके, प्रदीप राऊत, विकास अवचट, नवनाथ मुंडे, संघसेन कांबळे यासह आदींनी पार पाडली़(वार्ताहर)