शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात दोघे ठार; दोन गंभीर

By admin | Updated: November 22, 2014 23:05 IST

नागरी-वरोरा मार्गावर दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. यात एक जण जागीच ठार झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नागरी-वरोरा मार्गावर अपघात : दुचाकी एकमेकांवर आदळल्याहिंगणघाट: नागरी-वरोरा मार्गावर दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. यात एक जण जागीच ठार झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव दादाजी नारायण भट असे असून जखमीचे नाव सुनील लक्ष्मण मोहिते (३०) व शेख आरीफ मौलाना शेख असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार, वाघोली येथील दादाजी नारायण भट (६८) हे नागरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गत १० वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्याने सध्या हिंगणघाच्या दत्त मंदिर वॉर्डातील रहिवासी आहेत. आज ते नागरीवरून हिंगणघाटला येत असताना त्यांच्या दुचाकीला हिंगणघाट वरून नागरीकडे जाणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात दादाजी भट जागीच गतप्राण झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील सुनील लक्ष्मण मोहिते (३०) व शेख आरीफ मौलाना शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले. ते दोघेही नागपूरच्या ताजुद्दीनबाबाचे दर्शन घेवून नागरीला परत जात होते. या दोघांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)