तळेगावातील सत्याग्रही घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 04:10 PM2021-06-10T16:10:02+5:302021-06-10T16:11:06+5:30

Fire Caught to Truck : घटनेची नोंद तळेगाव पोलीस स्टेशने घेतली असुन पुढील तपास  ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात जमादार कैलास माहोरे, पो.शी. श्याम गहाट,  परवेज खाॅन, राहुल अमोने, देवेंद्र गुजर करीत आहे.

A truck moving in Satyagrahi Ghat in Talegaon took a beating | तळेगावातील सत्याग्रही घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट

तळेगावातील सत्याग्रही घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट

Next

तळेगांव (शा.पं)(वर्धा) :  येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरुन अमरावती कडुन नागपुरकडे जाणार्‍या ट्रकने सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिरासमोर  अचानक पेट घेतला ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० ते १२  च्या सुमारास घडली. 
 

अमरावतीवरुन नागपुर  कडे  केमीकल ड्रम, कास्टिक सोडा, व कपड्याच्या गठान  ट्रान्सपोर्टिंग कंपनीतुन घेवुन जानारा ट्रक क्र. एम एच -  40- बी एल -16 53 क्रमांकाचा ट्रक  जात असता तळेगाव शामजी पंत येथील सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिरा समोर  वायरिंग शॉट झाल्यामुळे अचानक चालत्या ट्रक ने पेट घेतला यामध्ये ट्रक चालक श्यामबाबु जाधव रा. ईलाहाबाद याने समय सुचता ठेवुन  लागलीच  तळेगाव पोलिस स्टेशनला फोन केला तेव्हा  लगेच तळेगाव पोलिस घटनास्थळी दाखल होवुन  त्यांनी ओरिएंटल पथवेज चा पाण्याचा टॅंकर व आर्वी येथील अग्निशामक  ला पाचारण केले. तो पर्यंत आगीने राैदरुप धारण केले होते. त्या दरम्यान काहि वेळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक ठप्प झाली होती. अग्निशामक घटनास्थळी दाखल होताच ट्रकची आग आटोक्यात आणली यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सदर घटनेची नोंद तळेगाव पोलीस स्टेशने घेतली असुन पुढील तपास  ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात जमादार कैलास माहोरे, पो.शी. श्याम गहाट,  परवेज खाॅन, राहुल अमोने, देवेंद्र गुजर करीत आहे.

Web Title: A truck moving in Satyagrahi Ghat in Talegaon took a beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app