शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

स्टील उद्योगांवर अडचणींचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या अपेक्षेने उद्योगांचे जाळे विणले जात होते. यामध्ये स्टील उद्योगांचीच संख्या अधिक आहे. या उद्योगांमुळे बऱ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांत जागतिक मंदीचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे. त्यात स्टील उद्योगांचीही संख्या मोठी असल्याने उद्योग समूहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशासनाने सवलती केल्या बंद । कोरोनामुळे उद्योगांच्या संकटात भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भ आणि मराठवाडा उद्योगांबाबत मागासलेला असतानाही रोजगारवाढीच्या दृष्टीने स्टील उद्योगांची उभारणी करण्यात आली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जागतिक मंदीच्या सावटात असलेल्या या स्टील उद्योगांना शासनाकडून मिळालेल्या सोयी-सुविधाही बंद करण्यात आल्याने स्टील उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यातच आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आणखीच भर घातली आहे.राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या अपेक्षेने उद्योगांचे जाळे विणले जात होते. यामध्ये स्टील उद्योगांचीच संख्या अधिक आहे. या उद्योगांमुळे बऱ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांत जागतिक मंदीचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे. त्यात स्टील उद्योगांचीही संख्या मोठी असल्याने उद्योग समूहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच विदर्भ व मराठवाडा इन्सेटिव्ह इलेक्ट्रिसिटी कनेक्शन यासारख्या इतरही सवलती राज्य शासनाने बंद केल्याने उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी, उद्योग समूहांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे.अशातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून जमावबंदी कायद्यांतर्गत घरून काम करण्याच्या सूचना शासन-प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी कंपन्याच बंद करण्याची वेळ आल्याने उत्पादन ठप्प झाले आहे.कंपन्यांना नुकसान झाल्यास त्याचा परिणाम साहजिकच काम करणाºया अधिकारी, कर्मचारी व कामगारांवर होणार आहे. उद्योग बंद पडल्यास हजारो कामगार रस्त्यावर येणार असून त्यांच्या कुटुंबावरही उपामारीची वेळ ओढवणार असल्याने शासनाकडून उद्योगांना उभारी देण्याची गरज उद्योग समूहांकडून व्यक्त केली जात आहे.देवळीतील महालक्ष्मी बंद होण्याचा मार्गावर ?विदर्भातील बेरोजगारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून देवळी येथील एमआयडीसी परिसरात महालक्ष्मी टी.एम.टी. नामक कंपनी उभारण्यात आली आहे. जागतिक मंदी आणि शासनाने बंद केलेल्या सवलती यामुळे कपंनी अडचणीत आली आहे. आता कोरोनाचाही फटका या कंपनीला सहन करावा लागत असल्याने आर्थिक संकटातून ही कंपनी सावरली नाही तर येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कंपनी बंद होण्याची शक्यता आहे. याचा फटका कामगार व कर्मचाऱ्यांनाही बसणार असल्याने याची माहिती कामगार प्रतिनिधींना दिल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक सुखराम दाखेरा व वरिष्ठ व्यवस्थापक श्याम मुंदडा यांनी सांगितले आहे.बेरोजगारीची टांगती तलवारविदर्भात आधीच बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यातही अस्तित्वात असलेल्या स्टील कंपन्या बंद झाल्या तर बेरोजगारीची समस्या वाढणार आहे. देवळीतील महालक्ष्मी कंपनीत परिसरातील असंख्य कर्मचारी व कामगार काम करीत आहे. ही कपंनी बंद पडली रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती कामगार प्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. रोजगार गेल्यास कुटुंबाच्या भरणपोषणाचीही समस्या कर्मचारी आणि कामगारांना भेडसावणार असल्याने उपाययोजनेची मागणी होत आहे.