शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कांचनगंगा बेस शिखरावर तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:53 IST

१६ हजार ५०० फूट उंची; कॅप्टन मोहन गुजरकर यांच्यासह ७ हिमगिरी ट्रेकर्सची कामगिरी

वर्धा : स्थानिक २१ महाराष्ट्र बटालियनचे एन.सी.सी. अधिकारी तथा प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील ७ पर्वतारोहकांनी भारताचे सर्वोच्च शिखर तथा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर माऊंट ‘कांचनगंगा’ च्या बेस कॅम्पपर्यंत १६ हजार ५०० फूट उंच चढाई उणे २० अंश सेल्सिअस तापमानात यशस्वीपणे पूर्ण करून ७ नोव्हेंबर रोजी भारताचा तिरंगा फडकावला.चढाईसाठी अत्यंत कठीण ‘कांचनगंगा’ बेस कॅम्प पर्वतारोहण अभियानाचे’ आयोजन मुंबईच्या हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशनचे संतोष तेलंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. २ नोव्हेंबर रोजी पश्चिम सिक्कीमच्या युकसम या ७५०० फूट उंच या ठिकाणावरून चढाईची सुरुवात करून करण्यात आली. सोका ९ हजार फूट उंच, फेडंग १२०० फूट, झोंगरी १२ हजार ५५० फूट, कोचरूंग १३ हजार ५० फूट, लामून १४ हजार फूट येथे रात्रीचा विसावा घेऊन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता १६ हजार ५०० फूट उंच असलेल्या ‘कांचनगंगा’ बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई करून तिरंगा फडकावला. परतीची चढाई लामून ते युकसम हे अंतर चार दिवसांत पूर्ण करून १० नोव्हेंबर रोजी अभियान यशस्वी झाले.‘कांचनगंगा’ सर करणारे शिखरवीरमाऊंट ‘कांचनगंगा’ शिखर नेपाळ-चिन-तिबेट-भारत सीमेलगत असून हा भाग चढाईकरिता खडतर, निरंतर वाहणारा प्रचंड हिमवारा व असुविधाजनक असल्यामुळे फार कमी गिर्यारोहक उत्साह दाखवितात. कांचनगंगा बेस मोहिमेत संतोष तेलंगे यांच्यासमवेत कॅप्टन मोहन गुजरकर, अभियंता सुनीत पिंपळे, डॉ. अनंत कामत, सहायक पोलीस निरीक्षक जावेद शेख, सुहास म्हात्रे, विजय पाटील व हेमा सुब्रमण्यम यांचा समावेश होता.