शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुभाजकातील झाडे झाली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोरील प्रकार : ग्रीन वर्धेच्या उद्देशाला बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रीन वर्धा या उद्देशाने वर्धा शहरातील सर्वच उद्यानांचा कायापालट करण्याचा विडा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलला आहे. परंतु, वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील जिल्हा कचेरीसमोरील रस्ता दुभाजकात उन्हाळ्याच्या सुरूवातीला लावण्यात आलेली झाडे अल्पावधीतच बेपत्ता झाल्याने ग्रीन वर्धेच्या उद्देशालाच बगल मिळत आहे. विशेष म्हणजे दुर्लक्षीत धोरण अवलंबल्याने तेथील रोपटे पाण्याअभावी मरण पावल्याचे सांगण्यात येत आहे.प्राप्त माहितीनुसार, शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती.त्यावेळी या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना ही रोपटे भुरळच घालत होती. परंतु, एक वेळा रोपटे लावले आणि आपण जबाबदारीतून सुटलो याचाच अवलंब करीत लावण्यात आलेल्या रोपट्यांच्या संगोपनाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अल्पावधीतच या मार्गावरील रस्ता दुभाजकातील रोपटे मरण पावली. इतकेच नव्हे तर काही झाडांवर मोकाट जनावरांनी ताव मारला. या मार्गाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा चौक पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकात तातडीने झाड लावण्यात यावे तसेच सदर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी एखाद्या विभागावर देण्यात यावी, अशी मागणी शहरातील वृक्षप्रेमींची आहे.रस्ता रुंदीकरणात कापली डेरेदार वृक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते महात्मा गांधी पुतळा चौक या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाच्या कामादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेली डेरेदार वृक्ष विकासाचे कारण पुढे करून कापण्यात आली. इतकेच नव्हे तर जी रोपटे रस्ता दुभाजकात लावण्यात आली. त्याच्या संगोपनाकडेही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली गेल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण