शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा ४ हजार ७६८ हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआर्वी, वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसान : २९४ गावे बाधित, प्रशासनाचा प्राथमिक अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रबी हंगामातील पिके मळणीच्या टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने शेतशिवार झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या २९३ गावातील ४ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनास सादर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये मंळवारच्या रात्री मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. काही परिसरात गारपीटही झाली. यामुळे वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर या आठही तालुक्यात कमीअधिक प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. या अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.आठही तालुक्यातील २९३ बाधित गावातील ६८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील सर्वाधिक ३० घरांची नोंद आहे. आर्वी तालुक्यात १४, देवळीत १३, हिंगणघाटात सात तर सेलू तीन घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे आर्वी आणि आष्टी तालुक्यातील प्रत्येकी एका गोठ्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.दोघे जखमी, जनावरेही दगावलीवादळी पावसासह कारंजा तालुक्यात वीज पडल्यामुळे सावल येथे एक तर खैरवाडा येथे तीन असे चार शेतकरी जखमी झाले आहे. एकावर कारंजा तर तिघांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रशासनाकडे केवळ दोन व्यक्तींची माहिती आल्याने प्राथमिक अहवालात दोन व्यक्तींचाच समावेश करण्यात आला आहे. तसेच सेलू व आष्टी तालुक्यात प्रत्येकी एक जनावर दगावले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती