शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

केंद्र शासनाच्या सबको घर या योजनेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे नगर पालिकेला घरकूल मंजूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी राहात असलेले कच्चे घर तोडून घरकूल आवास योजनेंतर्गत बांधकाम सुरू केले. मात्र, केंद्र शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे अनेक दिवसांपासून घरकूलधारक पालिकेत येरझारा करीत आहेत.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या निधीअभावी लाभार्थ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेस केंद्र शासनाच्या निधी न मिळाल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. केंद्रात भाजप तर राज्यात सत्तापरिवर्तन होत महाविकास आघाडीचे सरकार आल्याने याचा फटका गोरगरिबांना बसत असल्याच चर्चा आहे.केंद्र शासनाच्या सबको घर या योजनेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे नगर पालिकेला घरकूल मंजूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी राहात असलेले कच्चे घर तोडून घरकूल आवास योजनेंतर्गत बांधकाम सुरू केले. मात्र, केंद्र शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे अनेक दिवसांपासून घरकूलधारक पालिकेत येरझारा करीत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना आवास योजनेचे बाकीचे पैसे कधी मिळतील, याबाबत विचारणा केली असता केंद्राचा निधी प्राप्त झाल्यावर वाटप केले जाईल, असे सांगितले जात आहे. केंद्र सरकार घरकुलांसाठी निधी देणार तरी कधी ? असा लाभार्थ्यांचा प्रश्न आहे.घरकुलांसाठी गोरगरिबांनी आपली राहती घरे पाडून उघड्यावर संसार थाटल्याचा केंद्र शासन गांभीर्यांने विचार करीत नसल्याच्या भावना लाभार्थ्यांमधून व्यक्त होत आहेत. गरिबांचा विचार करून घरकुलाचा निधी त्वरित पाठवून गरिबांची चेष्टा थांबवावी, अशी अपेक्षा लाभार्थ्यांतून व्यक्त आहे.मुख्याधिकाऱ्यांना फोन घेण्याची ‘अ‍ॅलर्जी’पंतप्रधान आवास योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बातम्यांच्या अनुषंगाने त्यांच्याशी यापूर्वीही अनेकवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र कधीच प्रतिसाद दिला जात नाही, अशी पत्रकारांसह सर्वसामान्यांची ओरड आहे. जिल्हाधिकाºयांनी याची गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाकरिता निधी मिळत असल्याने अनेकांनी राहती घरे पाडली. मात्र, केंद्र शासनाकडून निधीच प्राप्त झालेला नाही. याविषयी लाभार्थी नगरपालिकेत संबंधितांकडे विचारणा करण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना