ठाकूर हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक
By Admin | Updated: August 7, 2015 01:56 IST2015-08-07T01:56:09+5:302015-08-07T01:56:09+5:30
येथील अजयसिंह ठाकूर याच्या हत्या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतच आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती.

ठाकूर हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक
आरोपींची संख्या सात : संख्या वाढण्याची शक्यता
वर्धा :येथील अजयसिंह ठाकूर याच्या हत्या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतच आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. आता त्याचा हत्येचा कट रचणाऱ्या अन्य तिघांना वर्धा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. यात एक अल्पवयीन आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या सात झाली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रजत मेश्राम (२२) व सोनू उर्फ रोशन चौबे या दोघांसह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. हे तिघेही हिंगदनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना अजयसिंह याला थेट मारले नसले तरी त्याला मारण्याच्या कटात हे सहभागी असल्याचे सांगण्यात आले आहे. अजयसिंह याच्याकडून सतत होत असलेल त्रासामुळे कट रचून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्वी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना ७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर बुधवारी अटक करण्यात आलेल्या तिघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार एम. बुराडे व विजय मगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)
चार चाकू जप्त
अजय ठाकूर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार चाकू जप्त करण्यात आले आहेत. अजसिंहवर याच चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात विक्की चौबे, नितीन ओरके, अक्षय खडसे व अक्षय तिघरे या चौघांकडून ही शस्त्रे जप्त करण्यात आली.