रंगला मद्यधुंदांचा ‘झिंगाट’; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह तीन विस्तार अधिकाऱ्यांनी धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 17:05 IST2020-01-17T17:04:59+5:302020-01-17T17:05:41+5:30

झिंगाट या गाण्याच्या तालावर ठेका धरला.

Three extension officers, including group education officers dance after drunk | रंगला मद्यधुंदांचा ‘झिंगाट’; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह तीन विस्तार अधिकाऱ्यांनी धरला ठेका

रंगला मद्यधुंदांचा ‘झिंगाट’; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह तीन विस्तार अधिकाऱ्यांनी धरला ठेका

वर्धा : वर्धा पंचायत समितीच्यावतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा ‘झिंगाट’ रंगला. झिंगाट या गाण्याच्या तालावर चक्क गटशिक्षणाधिकाऱ्यांसह तीन विस्तार अधिकाऱ्यांनी आणि काही शिक्षकांनी ठेका धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. 

हिंगणघाट तालुक्यातील मोझरी येथील घटना ताजी असताना वर्धा पंचायत समितींतर्गत तरोडा येथे गुरूवारी घेण्यात आलेल्या क्रीडा आणि सांस्कृतीक स्पर्धेतही मद्यधुंदांची मनमर्जी कायम राहिल्याने शिक्षण विभागातील असे अधिकारी व शिक्षक शिक्षिकी पेशाला काळीमा तर फासत नाही ना अशी चर्चा शिक्षकांसह पालक वर्गात होत आहे.

Web Title: Three extension officers, including group education officers dance after drunk