शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकरी ठेवीदारांचे ३३३ कोटी धोक्यात

By admin | Updated: May 24, 2014 00:03 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील

यंत्रणेची उदासीनता : रिझर्व्ह बँकेने व्यवहार दिला बंदीचा आदेश

वर्धा : भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना कलम २२ अंतर्गत बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे बँक खाते धारकांच्या ठेवी बुडण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने लिक्वीडेटर नेमल्यास जिल्ह्यातील २ लाख खातेधारकांच्या ३३३ कोटी रुपयांच्या ठेवी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाची उदासीनता या ठेविदारांच्या माथी आली आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३३३ कोटी रुपयांची कर्ज वसुली बाकी आहे. २ लाख शेतकरी खाते धारकांच्या ३३३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेतील सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे नमुद केले आहे. यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने ३५(अ) कलमान्वये १५ मे २०१२ रोजी नोटीस दिला होता. बँकेला दिलेल्या या नोटीसनुसार बँकांनी कर्जवसुल करणे गरजेचे होते. याकरीता राज्य शासनाने सहकारी बँकांना मदत करून आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे होते; मात्र राज्य शासनाने विदर्भाच्या बाबतीत सापत्न वागणुकीचा दाखला देत केवळ धुळे, जालना, नांदेड या बँकांना आर्थिक मदत केली. नागपूर, बुलढाणा व वर्धा बँकेला याचा काहीही लाभ मिळाला नाही. बँकेच्या संचालकांनी राज्य शासनाकडे निवेदन देवून बँकेकरिता पॅकेजची मागणी केली; मात्र आश्वासनाच्या पलिकडे काही मिळाले नाही. बँक बंद झाल्याने जिल्ह्यातील २८२ कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले असून ४६ शाखा बंद होणार आहेत. राज्य शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेवून बँकांना मदतीचे पॅकेज जाहीर केल्यास डबघाईस आलेल्या या सहकारी बँकाची स्थिती काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. या संदर्भात किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी राज्य शासनाला निवेदन दिले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)