शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने ऐवज परत ठेवला

By admin | Updated: November 17, 2014 22:58 IST

डेहनकर ले-आऊट येथे भर दिवसा घडलेल्या जबरी चोरीने शहरात चांगलीच दहशत पसरली होती. या चोरीला आज सात दिवसांचा कालावधी होत आहे. चोरीतील आरोपीच्या शोधात पोलीस असताना

पोलीसही अवाक् : डेहणकर ले-आऊट येथील चोरीला वेगळेच वळणवर्धा : डेहनकर ले-आऊट येथे भर दिवसा घडलेल्या जबरी चोरीने शहरात चांगलीच दहशत पसरली होती. या चोरीला आज सात दिवसांचा कालावधी होत आहे. चोरीतील आरोपीच्या शोधात पोलीस असताना सोमवारी कधी नव्हे असा प्रकार घडला. ही चोरी करणाऱ्या चोरट्याने लंपास केलेला ऐवज एका प्लास्टिकच्या पिशवीत जसाचा तसा आणून घरात टाकल्याने सारेच अवाक् झाले.. चोराच्या या कृत्याने पोलिसही विचारात पडले आहेत. यावरुन सदर चोरी प्रकरण नव्या वळणावर आले आहे. ११ नोव्हेंबर रोजी डेहनकर ले-आऊट येथील किशोर आकेल्ला यांची पत्नी घरी एकटी असताना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात दोन चोरट्यांनी चोरी केली. यावेळी आकेल्ला यांच्या पत्नीला मारहाण करून एका खुर्चीला बांधून ठेवले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातून हाती येईल तेवढा ऐवज घेवून पळ काढताना घरातील महिलेला घरातच बांधून ठेवले होते. याची माहिती असापासच्या परिसरात होताच नागरिकांनी त्यांच्या घराचे दार काढून पाहणी केली असता महिला दु:खात विव्हळत होती. नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून महिलेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली असल्याने पोलिसांनी चोरांचा पाठलाग करणे सुरू केले. या चोराचा सुगावा लागल्याची चर्चा पाहाता पाहता शहरात पसरली. या चोरापर्यंत पोहोचण्याची पोलिसांची तयारी असताना कोणत्याही चोरीत घडला नाही तसा प्रकार घडला. या चोरट्याने आकेल्ला यांच्या घरून लंपास केलेला सर्वच मुद्देमाल जसाचा तसास कुठलाही खर्च न करता तो एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्यांच्या घराच्या अंगणात टाकला. यामुळे सारेच अवाक् झाले. याची माहिती आकेल्ला यांनी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनीही तोंडात बोटे घातली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. चोरीच्या मुद्देमालावर असलेले चोरट्याचे ठसे मिळविण्याकरिता ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. कारवाई करून पोलिसांनी सदर ऐवज आपल्या ताब्यात घेतला. घटनेच्या सात दिवसानंतर चोरट्याने चोरी केलेला ऐवज जसाचा तसा तेवढाच त्या घरात आणून टाकल्याने यात काही वेगळाच संशय निर्माण होत आहे. ही चोरी करणारा चोरटा याच परिसरातील असावा, असा संशय बळावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने ऐवज घरात आणून टाकल्याने तो लवकरच पोलिसांच्या हाती येईल, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)