शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांच्या हक्काचा तांदळाला देतात हवा तसा आकार आणि सुगंध ; माफिया 'ब्रँड'च्या नावाने तुम्हाला विकत आहेत रेशन तांदूळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:19 IST

पुलगावातून चालतो काळाबाजार : पोलिसांसह पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरिबांना दोनवेळचे पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने अन्नसुरक्षा योजना अमलात आणली. त्याअंतर्गत राज्यात रेशनवर फुकट तांदूळ योजना सुरू झाली. स्थानिक पातळीवर या तांदळाचा काळाबाजार आधीपासूनच होता. आता तर त्याला जोर आला आहे. मात्र, आता हा रेशनचा तांदूळ सुगंधी बनवून त्याची बाहेर राज्यात जादा दराने विक्री केली जात आहे. हा सर्व कारभार पुलगाव येथून सुरू असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी पोलिसांनी कार्यवाही केली आहे. मात्र, तरीही आजघडीला 'रेशनिंग'च्या तांदळाचा काळाबाजार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील एका गोदामातून जवळपास ३० लाखांवर रेशनिंगचा तांदूळ साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पुलगाव शहरातील तीन ते चार काळाबाजार करणाऱ्यांनी आपले 'दुकान' बंद केले होते. मात्र, पुन्हा ते दुकानात काही दिवसांतच सुरू झाले आणि हजारो क्विंटल तांदूळ साठा गोदामातून राईस मिलमध्ये पाठविला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. याला पुरवठा विभागाकडून मूक संमती असल्याचा आरोप नागरिकांतून केला जातो आहे. तीन ते चार 'बडे' रेशन माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचे चित्र आहे. त्यांनी पोलिससह पुरवठा विभागालाही 'मॅनेज' केल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी 'बोट' दाखविण्याची हिंमत करत नाही, हे विशेष. 

मोठ्या 'ब्रँड'च्या तांदळात केली जाते 'मिक्सिंग'

रेशनचा तांदूळ जमवून तो पॉलिश केला जातो. यावर प्रक्रिया करणारे कारखाने इतके मोठे आहेत की, तेथे रोज हजारो टन तांदळावर प्रक्रिया होते. अत्याधुनिक तंत्राद्वारे तुम्हाला हवा तो आकार व सुगंधाचा तांदूळ बनवला जातो. बासमती, तुकडा यासह असंख्य ब्रॅण्ड येथे प्रक्रिया करून बनविले जातात. १० व २५ किलोची ब्रॅण्डनेम असलेली पोती तयार केली जाते. या तांदळाला डायनास्टी, वोल्गा ट्रिपल ए, दारा डबल स्टार अशी विविध नावे दिली जातात. त्यानंतर रेशनच्या तांदळाची मिक्सिंग करून पुढे जादा दरात विक्री केली जाते.

नाचणगाव, हिंगणघाट, आर्वीत गोदाम

शहरासह जिल्ह्यात घरोघरी फिरुन 'नॉट फॉर सेल' असलेल्या पोत्यातील तांदूळ मोठ्या रेशन तस्करांकडे घेऊन जातात. हे गोदाम नाचणगाव, हिंगणघाट तसेच आर्वी शहरात आहेत. या परिसरात पोलिस विभागाने यापूर्वीही कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, काही दिवस बंद ठेवून पुन्हा काळाबाजार सुरू झाला आहे. या गोदामांची माहिती पोलिसांसह पुरवठा विभागालाही आहे. मात्र, कारवाई का केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. या गोदांमाची तपासणी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.

"यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाईल."- चांदणी शिरपुरकर, तालुका पुरवठा निरीक्षक, वेबळी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ration rice illegally rebranded and sold at high prices by mafia.

Web Summary : Mafias are illegally rebranding and selling subsidized ration rice for profit. This illegal activity, centered in Pulgaon, involves polishing the rice, adding artificial scents, and mixing it with premium brands before selling it at inflated prices. Despite prior police actions, the black market persists, with alleged complicity from supply department officials.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रgovernment schemeसरकारी योजना