शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला मिळाले मूर्त रूप

वर्धा : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे ठिकाण राहिलेल्या सेवाग्राम-पवनार येथून नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. अखेर गुरुवारी आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवनार येथून या महामार्गाला प्रारंभ होणार असल्याचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे वर्धा जिल्हावासीयांसाठी ही मोठी उपलब्धी ठरली आहे.

नागपूर ते गोवा हा महाराष्ट्रशक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार असून, या जिल्ह्यांतील एकूण ३९ तालुक्यांतील ३७० गावे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांसह १८ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यापर्यंतचा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः आठ तासांवर येणे अपेक्षित आहे. म्हणूनच वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला. या आदेशामुळे या शक्तिपीठाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस मान्यतापवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाची अंदाजित लांबी ८०२.५९२ कि.मी. असून हा प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस मान्यता देण्यात आली. मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यांतील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ च्या कलम ३ व कलम १५ (२) ची अधिसूचना दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

महामार्गाकरिता २० हजार ७८७ कोटींचा खर्च

महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही शासनाने मान्यता दिली. सोबतच या प्रकल्पाकरिता १२ हजार कोटी मूळ रक्कम आणि ८ हजार ७८७ कोटींचे संभावित व्याज, अशा एकूण २० हजार ७८७ कोटींच्या रकमेसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वर्धा जिल्हा हा समृद्धी महामार्गाशी जोडल्यानंतर आता शक्तिपीठ महामार्गही जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात जिल्ह्याच्या पवनार येथून करण्यास मान्यता दिली. ही वर्धा जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी असून, त्यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती, ती आज पूर्णत्वास गेली. -डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री, वर्धा.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गMaharashtraमहाराष्ट्र