शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांचे ठाणे बदल

By admin | Updated: May 23, 2015 02:20 IST

नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला.

वर्धा : नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला. यामध्ये पाच वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणे आणि विविध शाखांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. काहींना त्यांची अडचण लक्षात घेऊन आहे तिथेच एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१ बदल्या पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या झाल्या आहेत. यात १७८ पोलीस नाईक, आठ चालक पोलीस नाईक आणि २३ महिला पोलीस नाईकचा समावेश आहे. यातील २१ जणांना आहे तिथेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. १७१ पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल १५१ पोलीस हवालदार, ११ चालक व ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. यामध्ये १३ जणांना आहे त्याच ठाण्यात एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.पोलीस शिपाई पदाच्या ६३ बदल्यांमध्ये ३२ पोलीस शिपाई, तीन चालक पोलीस शिफाई व २८ महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. सहायक फौजदार पदाच्या एकूण ८६ बदल्या करण्यात आल्या. यात सात जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना एक वर्षाची त्याच ठाण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ७० सहायक फौजदार, १३ चालक सहायक फौजदार आणि ३ महिला सहायक फौजदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदी तसेच पोलीस महासंचालकांचे पत्राच्या आधारे आस्थापना मंडळाने छाननी अंती या बदल्या करण्यात आल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी) ंबदली आदेशावरुन असाही सूरबदली आदेशावर प्रभारी पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी आहे. तसेच हे आदेश २० मे रोजी काढण्यात आले. वास्तविक, २१ मे रोजी अंकित गोयल यांनी पारस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला. एक दिवस उशिराने बदल्यांचा आदेश काढला असता तर त्यावर नव्या पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी असती, मग एक दिवसासाठी घाई का, असा सूर पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून काढला जात आहे.काहींना पारदर्शकता पाळल्याचा आनंदबदल्यांमध्ये काहींना मनाप्रमाणे ठाणी मिळाली नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे, तर काहींना हवे असलेले ठाणे मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बदल्यावरुन काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बदल्या पारदर्शक झाल्या असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीही विचारात घेतल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.