शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा

By admin | Updated: July 27, 2014 23:52 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना मदत वाटपासंदर्भात आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टी व पुरामुळे

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या : राष्ट्रीयकृत बँकांना निर्देशवर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना मदत वाटपासंदर्भात आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्यात. जिल्ह्यात सरासरी ८६.०२ टक्के पाऊस पडला असून, वर्धा, कारंजा व आर्वी तालुक्यात १०० टक्क्यापेक्षा अधिक पावसामुळे पुरपरिस्थीतीसह शेतीच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेताना ना. पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे मनुष्य व वित्तहानी संदर्भात तत्काळ पंचनामे करून सानुग्रह अनुदानाचे वाटप पूर्ण करा. घरांच्या नुकसानी संदर्भात केवळ अतिवृष्टी कालावध न धरता त्यानंतरही घरांची पडझड झाली असेल तर त्याबाबतही पंचनामे करून अनुदानाच्या वाटपापासून कुणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात केलेली पेरणी, त्यानंतर पावसाचा खंड यामुळे दुबार पेरणीचे संकट तसेच अतिवृष्टी संदर्भात पिकांचे झालेले नुकसान याबाबत सविस्तर आढावा घेवून नुकसानी संदर्भात पंचनामे करा. अशा सुचना करतांना शेतपिकांचे डुक्कर व रोह्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याबाबतही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. अनिल देशमुख, ना. रणजीत कांबळे, ना. सचिन अहिर, विदर्भ सिंचन पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. सुरेश देशमुख, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)