टेकोडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:07 IST2019-05-15T19:07:30+5:302019-05-15T19:07:44+5:30
गावालगत असलेल्या कॅनॉल जवळील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

टेकोडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
तळेगाव : आष्टी तालुक्यातील टेकोडा येथील रहिवासी असलेले एकनाथ सुखदेव साबळे (वय 40 वर्ष) यांनी आज गावाच्या कॅनॉललगत असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साबळे यांच्याकडे दीड एकर जमीन असल्याचे समजले आहे.
आज सकाळीच प्रातःविधी साठी गेले असता गावालगत असलेल्या कॅनॉल जवळील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे राजेंद्र साबळे यांनी पोलिसाना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गेल्या चार दिवसापासून मृतकाची पत्नी आपल्या दोन मुलीसह पुणे येथे गेली असल्याचे समजले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात निलेश पेटकर, रोशन डाये करीत आहेत.