शॉट सर्किटमुळे ऊस स्वाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:03 IST2017-10-02T00:01:50+5:302017-10-02T00:03:06+5:30

शॉट सर्किटमुळे ऊस स्वाहा
ठळक मुद्देकोलगाव येथील घटना ३.५० लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : कोलगाव येथे वीज तारांमध्ये घर्षण झाल्याने पावणे पाच एकरातील ऊस जळाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात शेतकºयाचे ३.५० लाख रुपयांचे नुकसान झाले.
सुनील मधुकर गुळघाणे हे दहा वर्षांपासून यादव आष्टनकर यांची पावणे पाच एकर शेती ठेक्याने करतात. काही दिवसांत कापणीस येणारा ऊस वीज तारांच्या घर्षणाने जळाला.
याबाबत शेतकºयाने वीज वितरणच्या घोराड शाखेकडे तक्रार करताच अभियंत्याने शेताची पाहणी केली. पूर्ती कारखाना जामणीचे अधिकारीही शेताच्या बांधावर पोहोचले. नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी सुनील गुळघाणे यांनी केली आहे.