शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा जिल्ह्यातील ७० गावांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्राथमिक अहवाल : १ हजार ७०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १० व ११ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल ७० गावांना तडाखा दिला. यात १ हजार ७०८ हेक्टरवरील गहू, चणा, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला.डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.यात शेतातील काढणीला आलेले गहू आणि चण्याचे प्रचंड नुकसान झाले. गहू पीक भुईसपाट झाले. तर मजुरांअभावी शेतातच असलेला कापूसही खराब झाला. वादळीवारा आणि पावसामुळे ६१ गावांत अंशत: घरांची पडझड झाली. तर दोन ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ३२ गावांत १ हजार ३२३ हेक्टर, सेलू तालुक्यातील एका गावात ६५ हेक्टर आर., देवळी तालुक्यातील २६ गावांत ८० हेक्टर आर., हिंगणघाट तालुक्यातील सात गावांत १४० हेक्टर आर. तर समुद्रपूर तालुक्यातील चार गावांत १०० हेक्टरवरील शेतपिकांची मोठी हानी झाली. वादळवाºयामुळे एक व्यक्ती जखमी झाली तर एका जनावराचा मृत्यू झाला.वर्धा, देवळी तालुक्यात सर्वाधिक नुकसानमंगळवारी आणि बुधवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा आणि देवळी तालुक्यातील अनुक्रमे ३२ आणि २६ गावांत शेतपिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवालाच्या आधारे नुकसान झालेल्या शेतपिकांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मदतीकरिता जिल्हा प्रशासनाला अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गारपीट, वादळवाऱ्यामुळे पिकांचे नुकसानवर्धा : १० मार्चला सायंकाळी वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे तरोडा आणि तळेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गहू, चणा, कापूस, भाजीपाल्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे सर्वेक्षण करीत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. संबंधित गावात यावेळी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग देशमुख, पंचायत समिती सदस्य सुभाष चांभारे, संगीता मेहत्रे, तरोड्याच्या सरपंच शुभांगी चांभारे, मदनीचे सरपंच ललित कुरेकर, येसंबाचे सरपंच सत्यपाल भगत, गोजीच्या सरपंच शुभांगी गणोरे, सोनेगावचे सरपंच धनपाल भस्मे, भानखेड्याचे सरपंच विलास भालकर, धोत्र्याचे सरपंच उज्ज्वला गुरनुले, एकुर्लीच्या सरपंच लता हिंगे, नेरीचे सरपंच यशवंत गावंडे, भूगावच्या सरपंच दुर्गा थूल, श्रीकांत पाल, शोभा वानखेडे, सतीश धोटे, मनीषा मानकर, मनीषा वानखेडे महादेव धोपटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस