शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी याचिका सादर करा

By admin | Updated: December 18, 2014 02:06 IST

मुस्लीम समाजाला नोकरी व सर्व क्षेत्रात ५ टक्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे आता मुस्लिमांना सर्व क्षेत्रामध्ये १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी याचिका सादर करावी, ...

वर्धा : मुस्लीम समाजाला नोकरी व सर्व क्षेत्रात ५ टक्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे आता मुस्लिमांना सर्व क्षेत्रामध्ये १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी याचिका सादर करावी, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लीम विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष शोएब अहेमद कन्नोजी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.निवेदनानुसार २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात मुस्लीम समाजाची संख्या १०.६ टक्के दर्शविण्यात आली. ती मुस्लीम समाजाला मान्य नाही. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या १६ टक्के असल्याचे समाजाचे म्हणणे आहे. अन्य जातींना ज्या प्रकारे आरक्षण देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतातील मुस्लिमांना केंद्रात आरक्षण देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली. यावर सर्वेक्षण करून सच्चर समितीद्वारे प्राप्त अहवालावरून मुस्लीम समाजाची सद्यस्थिती मुस्लीम मागास असल्याचे निदर्शनास आले. समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये मागासलेले आहे, असा अहवाल केंद्र सरकार यांना दिला. तसेच २००८ मध्ये डॉ. महेमुदूर्रहमान चौकशी समिती स्थापन करण्यात आली. यासंदर्भातील अहवाल २०१३ मध्ये सादर करण्यात आला. विकास करण्यात आला. त्यात मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रामध्ये राज्य शासनाने केवळ ५ टक्के आरक्षण दिले आहे. राज्य शासनाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण दिले आहे. ते आरक्षण त्यांना मिळू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात हेतूपुरस्सर याचिका दाखल झाल्यावर न्यायलयाने मुस्लिमांना शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण समाप्त केले. शिक्षणात देण्यात आलेले आरक्षण मात्र मान्य केले. परंतु यामुळे मुस्लीम समाजाला नोकरीमध्ये इतर समाजाच्या तुलनेत तग धरताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नोकरी व अन्य संदर्भात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोणातून १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी याचिका सादर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.निवेदन देताना शिष्टमंडळात महाराष्ट्र मुस्लीम विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष शोऐब अहेमद कन्नौजी, सय्यद रशिद अली, समिर बेग, नौशाद शाह, अर्शि मलिक कन्नौजी, राकेश जैस्वाल, प्रवीण ताकसांडे, कमलेश जैस्वाल, बाबा कन्नौजी इत्यादी कार्यकर्त्यांनी आदींचा समावेश होता. मुस्लीम समाजाला इतर समाजाप्रमाणेत मुख्य प्रवाहात राहण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी)