शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याने तयार केले विलगीकरणातील नागरिकांसाठी संकेतस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे, याचेही मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकतात. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधू शकतात. अनेक समूह या स्थळावर दोनच दिवसांत निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देदेश-विदेशातील नागरिकांना एकांतवासात मिळतोय दिलासा। विविध प्रकारची माहिती उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विलगीकरणात बंदिस्त झालेल्या नागरिकांसाठी शालेय विद्यार्थ्याने तयार केलेली एक वेबसाईट (संकेतस्थळ) देश-विदेशातील नागरिकांना एकांतवासातही दिलासा देणारे ठरले आहे.विदेशातून किंवा परप्रांतातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणात राहणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आले आहे. हा दीर्घ कालावधी अनेकांची अस्वस्थता वाढविणारा आहे. विलगीकरणातील व्यक्तींच्या एकांतवासाची ही अस्वस्थताप्रखर या दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करून गेली. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांचा मुलगा प्रखर याने कुटुंबात चाललेली विलगीकरणावरील चर्चा ऐकली आणि याबाबत आपण काय करू शकतो, यावर विचार करणे सुरू केले. यातूनच एकांतवास वाट्याला आलेल्यांसाठी विरंगुळ्याचे साधन म्हणून संकेतस्थळ तयार करण्याचे त्याने ठरवले. यासंदर्भात त्याने वडील डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्सइनक्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ जन्माला आले.या संकेतस्थळाच्या पहिल्या पृष्ठावर स्वतंत्रपणे राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दैनंदिन बातम्या, विभिन्न घडामोडी येथे उपलब्ध आहेत. चित्रपट, संगीत, विनोदी खेळ यासोबतच समुपदेशन आणि ध्यानधारणा करण्याचे तंत्रही येथे उपलब्ध आहे.वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे, याचेही मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकतात. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधू शकतात. अनेक समूह या स्थळावर दोनच दिवसांत निर्माण झाले आहेत. अत्यंत कमी कालावधीत भारतासह विविध देशांतील असंख्य लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून त्यात नव्याने काही भर टाकण्याचा विचार करीत असल्याचे प्रखर श्रीवास्तव या विद्यार्थ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस