रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:41 PM2018-01-28T23:41:16+5:302018-01-28T23:41:41+5:30

गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे.

 Striking Patients | रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

Next
ठळक मुद्देयवतमाळच्या रूग्णाला शासकीय योजनेचा मिळवून दिला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे. त्यांचे हे कार्य गरजू रुग्णांना आधार देणारे ठरत आहे.
वर्धा शहरात विदर्भातील दोन मोठे रुग्णालय असून येथे दररोज जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाºयामध्ये बहूतांश रुग्ण गरीब राहत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. शिवाय त्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणाºया शासनाच्या विविध योजनांची माहितीही नसते. गरजू व गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते सहाय्य करतात. अपघातात गंभीर जखमी झालेला यवतमाळ जिल्ह्यातील जमील खाँ पठान नामक तरूण सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असून त्याला रक्ताची गरज असल्याची माहिती प्रहारच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यानंतर तात्काळ प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून रुग्णासाठी रक्त उपलब्ध करून दिले. दीड महिन्यापासून भरती असलेल्या रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या कुटूंबियांना ३८ हजारांचे देयक भरण्याचे सांगण्यात आले;पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ही रक्कम कशी भरावी, असा प्रश्न रुग्णाच्या कुटूंबियांसमोर होता. याची माहिती मिळताच प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून प्रशासकीय अधिकाºयांना विनंती करून रुग्णाचे सदर देयक माफ करून घेतले. शिवाय पूर्वी भरलेले १२ हजार रुपये रुग्णाच्या कुटूंबियांना परत मिळवून दिले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश उराशी बाळगून आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, राजेश सावरकर, आदित्य कोकडवार, प्रशील धांदे, विजय सुरकार, नितेश चतुरकर, पवन दंदे, भूषण येलेकर, शुभम भोयर, श्याम शेलार प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

गरजूला उपलब्ध करून दिले जातेय रक्त
अपघातात जखमी झालेल्यांसह विविध शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची गरज असते. बहूदा रुग्णालयातूनही रक्त उपलब्ध राहत नाही. अशा वेळी माहिती मिळताच प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळीच रुग्णालय गाठून रक्तदान करून रुग्णांना रक्त उपलब्ध करून देतात.

Web Title:  Striking Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.