शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते निर्मनुष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते.

ठळक मुद्देबच्चे कंपनी रंगली खेळात : मोठ्यांनी दूरचित्रवाणी संचाचा घेतला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला वर्धेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रस्त्यांवरील वर्दळ बंद असल्याने सर्वत्र स्मशानशांतता पसरलेली होती. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. बच्चे कंपनीने दूर सारत बुद्बिबळ, सापसिडी, कॅरम खेळांत रंगले. मोठ्यांनी दूरचित्रवाणी, संगीत संचाद्वारे मनोरंजन केले तर चाकरमान्यांनी प्रलंबित कामे उरकण्यावर भर दिला.जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होतेय आरोग्य तपासणीवर्धा : मध्यरात्रीपासून रेल्वे सेवा बंद करण्यात आली असली तरी त्यापूर्वी सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्या नियोजित ठिकाणी पोहोचत आहेत. रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान रेल्वेचा प्रवास करून जिल्ह्याबाहेरून वर्ध्यात आलेल्या प्रवाशाची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.जिल्ह्याबाहेरून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकावर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पोलीस विभागातील अधिकाºयांसह कर्मचाºयांचे लक्ष आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाला अटकाव घालण्यासाठी यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धेकरांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यू पाळला. याच जनता कर्फ्यू दरम्यान रेल्वेचा प्रवास करून जिल्ह्याबाहेरून वर्ध्यात आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. यावेळी या प्रवाशांमध्ये कोरोनाची कुठली लक्षणे तर आढळत नाही ना याची खातरजमा वैद्यकीय अधिकाºयांनी केली. शिवाय त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शनात्मक सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा बसस्थानक ओस...बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते.रेल्वेस्थानकावर शुकशुकाट...कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लांब पल्ल्यासह अनेक रेल्वेगाड्या तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून गर्दी आणि प्रवास टाळण्याच्याही शासन-प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावर रविवारी असा शुकशुकाट होता.रेल्वेस्थानकाचे निर्जंतुकीकरणजनता कर्फ्यूच्या निमित्ताने रेल्वेसेवा बंद होती. याच दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकाची स्वच्छता करून ते निर्जंतुक करण्यात आले. मध्यरात्रीपूर्वी सुटलेल्याच रेल्वेगाड्या वर्धा, सेवाग्राम, पुलगाव या रेल्वे स्थानकांवर आल्या. जिल्ह्याबाहेरून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली.घंटागाड्यांनाही क्षणभर विश्रांती...शहरातील विविध वॉर्डातील ओला आणि सुका कचरा नगरपालिकेच्या याच घंडागाड्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने दररोज संकलित केला जातो. जनता कर्फ्यूमुळे बंदच्या पार्श्वभूमीवर रविवारी या गाड्यांनाही क्षणभर का होईना अशी विश्रांती घेता आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या