शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सेलू बसस्थानकावर जलद गाड्यांचा थांबा द्या

By admin | Updated: November 16, 2014 23:11 IST

येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते.

सेलू : येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते. त्यामुळे सर्व जलद गाडया या बसस्थानकावर याव्या अशी मागणी प्रवासी वर्गातून वारंवार केली जात आहे. काही वर्षापूर्वी सर्व सुपर बसगाड्यांसह जनता गाड्या या स्थानकावर थांबून पूढे जायच्या. परंतु तालुकास्तरावरील महत्त्वाचे बसस्थानक आज मात्र दुर्लक्षित झाले. रात्रीचा अंधार पडण्याआधीच येथे सर्व सामसूम झालेले असते. निर्मनुष्यतेचा फायदा घेत येथे अनुचित प्रकार वाढत असल्याची लोकांना भीती आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व बसगाड्या स्थानकात याव्या असे सर्वांना वाटते, मात्र बसस्थानकावर बसगाड्यांचे आवागमन करताना वाढते अतिक्रमण व रस्त्याच्या दुतर्फा दुकानाचा त्रास होतो. यामुळे बसचालक बसस्थानकावर बस पोहचवू शकत नाही. ग्रामपंचायत व बांधकाम विभाग यांनी समन्वय ठेवून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण कमी केले तर बसस्थानकावर बस पोहचू शकते. ग्रामपंचायत प्रशासन या प्रयत्नात आहे. त्यांनी सिमेंट रस्त्याच्या दोनही बाजूला डांबरी रस्त्याचे जोड लावून रस्ता मोठा केला. रस्त्याच्या मधात येणारे हनुमानजींचे मंदिर दुसरीकडे स्थानांतरित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही मंडळी मंदिराला हटविण्याबाबत तसेच विशालकाय झाडाला कापण्याचाही विरोध आहे. सर्वांचा विश्वास संपादन करुन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळून हे मंदिर हटविण्यात आले तर वळणावर रस्ता मोठा होवून वाहतुकीची कोंडी सुटू शकते. परंतु मंदिर हटविण्याची प्रक्रिया थोडी अडचणीची ठरत असल्याने कामास विलंब होत आहे.ग्रामपंचायत प्रशासन सर्व जलद बसगाड्या गावात येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्या जाते. बायपास थांब्यावर प्रसाधनग्रह उभारण्यास जागा नसल्याने प्रवाशांची व विशेषता: महिलांची कुचंबना होते. यामुळे गावातील बसस्थानकावर सर्व बसगाड्यांचा थांबा असल्यास सर्व प्रश्न मिटू शकतात. त्यामुळे बसगाड्या बसस्थानकावर याव्यात अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)