शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन सुरूच

By admin | Updated: May 16, 2017 01:20 IST

शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.

कामगारांच्या मागण्यांचा तिढा कायमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. सदर कामगाराला तात्काळ कामावर घेण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी रविवार ७ मे पासून संस्कार अ‍ॅग्रोप्रोसेसमधील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ रोजी कामबंद आंदोलनाच्या आठव्या दिवशीही कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. कुठलीही पूर्व सूचना न देता सदर कंपनी प्रशासनाने जवळपास ४० कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप करीत हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. कुठलीही सुचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवार ७ मे पासून प्रहारच्या नेतृत्त्वात कंपनीतील जवळपास ३५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे गजु कुबडे, शहर प्रमुख विकास दांडगे करीत असून आंदोलनात दादा बोरकर, प्रशांत घोडखांदे, नितीन काटकर, उमेश ठाकरे, सुधाकर भोमले, दिवाकर भोभरे, राजु सेलेकर, प्रशांत वेले, ज्योती यादव, वंदना भोयर आदी सहभागी झाले आहे.भरायला लावला फॉर्मसंस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील चार कामगारांचे प्रकरण कामगार न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवार १२ मे ला सदर चार कामगार वगळता इतर सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, असे निर्देश कामगार न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने १३ मे ला कामगार कामावर गेले असता कामगारांना एक फार्म भरून देण्यास सांगण्यात आले. परंतु, कंपनी प्रशासनाचा हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाला बगल देणारा असल्याचा आरोप करीत कामगार कामावर रुजू झाले नाही. शासकीय नियमानुसार आपली कंपनी कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला देते. ज्या दिवशीपासून आंदोलन सुरू करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला मागण्यांचे कुठलेही लेखी निवेदन प्राप्त झाले नाही. सुरूवातीला कामावरून कमी करण्यात आलेल्या चार कामगारांना कामावर घ्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे असे कळले होते;पण आता कामगार न्यायालयानेही त्यावर मार्गदर्शनात्मक निर्देश दिले आहेत. सध्या कामगारांची काय मागणी आहे त्याची आपणाला कल्पना नाही.- डॉ. कैलास सिंघानिया, संचालक संस्कार अ‍ॅग्रो.पो. वायगाव (नि.)