शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवाहनचालकांचा जीवघेणा प्रवास। आजवर झालेत शेकडो अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-सालोड (हिरापूर) राज्य महामार्गाची ठिकठिकाणी डांबर उखडून दैना झालेली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते. दुचाकीचालकांना येथून मार्गक्रमण करताना तारेवरचीच कसरत करावी लागते. हजारावर खड्डे असल्याने संपूर्ण महामार्गच खड्ड्यात गेल्याचे येथून मार्गक्रमण करताना दिसून येते. सालोड, चिकणी (जामणी) व परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल याच मार्गावरून आणावा लागतो.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवार शेतमाल भरून असलेले वाहन या दुर्दशित रस्त्यामुळे नादुरुस्त होते. महामंडळाच्या बसेस या मार्गावर नेहमीच नादुरुस्त होताना दिसतात. एकंदरीत मार्गाच्या दुर्दशेमुळे सर्वांनाचा फटका बसत आहे. मार्गाच्या कडाही खचलेल्या असून विरुद्ध दिशेने एकाचवेळी दोन वाहने आल्यास लहान वाहनांना अपघात होतो. नागपूर, वर्ध्यावरून यवतमाळ येथे जाण्यास हा मार्ग सोयीचा आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले. यापूर्वीही कित्येकांना अपंगत्व आले आहे. सर्वत्र मार्गांचे सिमेंटीकरण केले जात असताना या महामार्गाच्या नूतनीकरणाकडे शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून संभाव्य धोका लक्षात घेऊन या महामार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सालोड (हिरापूर) व परिसरातील गावांतील नागरिकांनी केली आहे.पाच किलोमीटर महामार्ग खड्ड्यातवर्धा-सालोड (हिरापूर) अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे. या संपूर्ण महामार्गाची मागील कित्येक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. मार्गावर हजारावर खड्डे आहेत. रात्री वाहनचालकांना हे खड्डे दृष्टीस पडत नसल्याने वाहने उसळून अपघात होतात. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पाठतुळजापूर-बुट्टीबोरी मार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे. शहरातही विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष का होत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा