शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाने मिसाबंदीचा सन्मान निधी केला बंद; उच्च न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:34 IST

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाने मिसाबंदी व सत्याग्रहींसाठी सन्मान निधी सुरू केला होता. मात्र, महाविकास आघाडी शासनाने तो बंद केला आहे. शासनाच्या आदेशाविरुद्ध लोकतंत्र सेनानी संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून तो परत सुरू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देलोकतंत्र सेनानी संघाकडून याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाने मिसाबंदी व सत्याग्रहींसाठी सन्मान निधी सुरू केला होता. मात्र, महाविकास आघाडी शासनाने तो बंद केला आहे. शासनाच्या आदेशाविरुद्ध लोकतंत्र सेनानी संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून तो परत सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

लोकशाहीच्या या देशात पुन्हा लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी अनेक मंडळी मिसा कायद्याखाली तुरुंगात गेले होते. त्यांना सोडविण्यासाठी त्यावेळी अठरा-वीस वर्षांच्या युवकांनी पुढील परिणामाची चिंता न करता सत्याग्रह जेलभरो आंदोलन केले. परिणामी, इंदिरा गांधींनी या देशावर १९७५ साली लादलेली आणीबाणी हटविणे तत्कालीन काँग्रेस शासनाला भाग पडले. अखेर पुन्हा देशात लोकशाहीची पाळेमुळे मजबूत झाली. त्यावेळी घरादारावर तुळशीपत्र ठेवून लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या लोकतंत्र सेनानींना भाजप शासनाने प्रतिमाह दहा हजार रुपये, त्यांच्या विधवांना पाच हजार रुपये मानधन सुरू केले होते. परंतु, महाविकास आघाडी शासनाने ३१ जुलै २०२० ला एक आदेश काढून ते मानधन बंद केले.

मिळणारा सन्मान निधी शासनाला कुठल्याही कारणाने बंद करता येत नाही. कोरोनाकाळात ते स्थगित केले असते तर समजून घेता आले असते. पण, महाविकास आघाडी सरकारने ते कायमस्वरूपी बंद केले. त्यामुळे हे मानधन कोणत्या कारणाने बंद करण्यात आले, याचा जाब विचारण्यासाठी लोकतंत्र सेनानी संघाने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. लोकतंत्र सेनानी संघाकडून विजय फलके, राजाभाऊ सावरकर, अरविंद ओक व मोहन जगताप यांनी ही याचिका दाखल केली असून अ‍ॅड. समीर व सुकृत सोहोनी बाजू मांडणार आहेत.

राज्यातील साडेतीन हजार लोकतंत्र सेनानी अडचणीतराज्यभरात ३ हजार ५०० लोकतंत्र सेनानी हयात असून ते सर्व विविध आजाराने ग्रस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या सर्वांची परिस्थिती हलाखीची असून औषधोपचार करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या लढवय्या सैनिकांपुढे भीक मागणे हाच पर्याय राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारने काढलेला हा आदेश पूर्णत: चुकीचा असून सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन त्वरित द्यावे, तसेच सन्माननिधी पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय