शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांकरिता रात्रीच्या प्रवासाला एसटीची सुरक्षा; बसमधील दिवे आता सुरूच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा अनेक महिलांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना समाजकंटकांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बसमधील दिवे बंद न करण्याच्या सूचना एसटीच्या चालक-वाहकांना दिल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : रात्रीच्या वेळी अनेक महिला एकट्यादुकट्या प्रवास करतात. प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा अनेक महिलांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना समाजकंटकांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बसमधील दिवे बंद न करण्याच्या सूचना एसटीच्या चालक-वाहकांना दिल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.या निर्णयासंदर्भात  विभाग नियंत्रक कार्यालयाला हे निर्देश देण्यात आले आहे. अनेक महिला साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या बसमधून प्रवास करतात. आता या निर्णयामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, तळेगाव, पुलगाव व वर्धा असे पाच आगार आहेत. या आगारात एकूण २१३ बसेस धावत आहेत. अनेक बसेस लांब पल्ल्याच्या असतात. त्यात अनेक महिलाही प्रवास करतात त्यामुळे हा आदेश सर्व विभाग नियंत्रक कार्यालयाकडून चालक-वाहकांपर्यंत पोहोचवून आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

विनंती करावी लागणार! महिलांना रात्रीच्यावेळी बसमधून प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेऊन महामंडळाने रात्रीच्या सुमारास बसमधील सर्व दिवे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. आता बसमधील एका महिलेने जरी दिवे सुरू करण्याची विनंती केली तर चालक-वाहकाला रात्रीला दिवे सुरू ठेवावे लागणार आहे. 

एसटी बसचा प्रवास सर्वात सुरक्षित आहे. महामंडळाकडून आलेल्या आदेशानुसार एखादी महिला रात्री प्रवास करीत असेल व तिने बसचा दिवा बंद न करण्याची सूचना केल्यास दिवे सुरुच राहतील, असे सर्व वाहक-चालक यांना निर्देश देण्यात आले आहे.- विनोद खंडार, बसस्थानक प्रमुख, आर्वी आगार.

महिलांकडून निर्णयाचे स्वागत आम्हा महिलांना नोकरी किंवा कुटुंबीयांची प्रकृती खराब झाली तर रात्री-बेरात्री प्रवास करावा लागतो. मात्र प्रवास करताना एक प्रकारची अनाहूत भीती मनात असते. परंतु आता महामंडळाने हा निर्णय घेतल्याने अनेक  महिलांची भीती काही प्रमाणात कमी होईल, या निर्णयाचे मी स्वागत करते.- सुनिता दामोदर बोबडे.

एसटीने किंवा इतर खाजगी वाहनाने प्रवास करताना रात्री भीती वाटत होती. मात्र आता या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे आम्हा महिलांकडून स्वागतच आहे.- ललिता नारायण केने. 

 

टॅग्स :state transportएसटी