शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या वाढविण्यासाठी यंदाही पालक संपर्क अभियान

By admin | Updated: April 21, 2016 02:27 IST

शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते.

२५ ला प्रारंभ : आरटीईअंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरूवर्धा : शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते. या अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पुन्हा याच धर्तीवर हे अभियान यंदाही राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, अशी माहिती जि.प. शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.या अभियानाला येत्या २५ एप्रिलला समुद्रपूर पंचायत समिती येथून प्रारंभ करण्यात येणार असून ३० एप्रिलपर्यंत ते चालणार आहे. या अभियानांतर्गत पालकांना जिल्हा परिषद शाळांचे वैशिष्ट्ये समजावून आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घ्यावा, असा विनंतीवजा आग्रह करणार असल्याचेही आंबटकर म्हणाले. अभियान राबविताना शैक्षणिक व्यावसायिक पात्रता असलेले शिक्षक, संगणकीकृत शाळा, डिजिटल शाळा, इ-लर्निंग शाळा, मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध, उपस्थिती भत्तावाटप योजना, शिष्यवृत्ती योजना, क्रीडांगणाची सोय, स्वच्छ-शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, बोलक्या भिंती असलेल्या वर्ग खोल्या व शाळा, ज्ञानरचनावादानुसार अध्यापन, कृतीयुक्त अध्यापन पद्धतीवर आधारीत अध्यापन या बाबी पालकांना समजावून सांगणार असल्याची माहितीही आंबटकर यांनी यावेळी दिली. यावेळी समाजकल्याण सभापती वसंत पाचोडे, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, किशोर चौधरी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)