शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

पश्चिम विदर्भात मागील पंधरवाड्यापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. अशातच ढगाळी वातावरणामुळे पाहिजे तसा सुर्यप्रकाश उभ्या पिकांना सध्या मिळत नसून जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण घटत आहे. याचाच परिणाम सध्या उभ्या सोयाबीन पिकांवर दिसून येत असून उभे पीक अचानक पिवळे पडत आहे.

ठळक मुद्देकृषी शास्त्रज्ञांचा दावा । सततच्या पावसाचाही फटका, किडींनीही केलाय ‘अटॅक’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सततच्या पाऊस, ढगाळ वातावरण तसेच जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण घटत असल्याने उभे सोयाबीन पीक सध्या पिवळे पडत असल्याचा दावा सेलसुरा येथील कृषी तंत्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केला आहे.पश्चिम विदर्भात मागील पंधरवाड्यापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. अशातच ढगाळी वातावरणामुळे पाहिजे तसा सुर्यप्रकाश उभ्या पिकांना सध्या मिळत नसून जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण घटत आहे. याचाच परिणाम सध्या उभ्या सोयाबीन पिकांवर दिसून येत असून उभे पीक अचानक पिवळे पडत आहे. ज्या शेतात पावसाचे अधिक पाणी साचलेले आहे त्या शेतमालकाने चर काढून शेताबाहेर साचलेले पावसाचे पाणी काढावे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. अशातच सोयाबीन पिकाला पाहिजे तसा सुर्यप्रकाश प्रकाशसंषलेशनासाठी कमी पडत आहे. अशातच सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत असले तरी शिरा मात्र हिरव्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पॉटेशियम नायट्रेट (१३.४.४५) (१०० ग्रॅम/१० लिटर पाणी)ची फवारणी करावी, असा सल्ला डॉ. उंबरकर यांनी दिला आहे.हवेतील आर्द्रतेमुळे पानासह शेंगांवर ठिपकेसोयाबीन पिकाच्या पानांसह शेंगावर ठिपक्यांचे प्रमाणे हवेतील अधिक आर्द्रतेमुळे वाढल्याचे दिसून आले आहे. सोबतच खोडमाशी आणि चक्रभुंगा किडीचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पिकांवर औषधांची फवारणी करावी.

टॅग्स :agricultureशेती