शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची चाळणी

By admin | Updated: October 3, 2014 02:04 IST

जिल्ह्यात सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला चढविला असून यात सेवाग्राम परिसरात शेतातील सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली आहे.

सेवाग्राम : जिल्ह्यात सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला चढविला असून यात सेवाग्राम परिसरात शेतातील सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पन्न होण्याबाबत शंका वर्तविली आहे. पिकावर अळीने हल्ला चढविला असून याबाबत कृषी विभागाकडून मात्र मार्गदर्शन मिळत नाही. यातून कसे वाचावे असा नवा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचे या हंगामातील पूर्ण गणितच बिघडले आहे. त्याच्या पेरण्याच्या काळापासून तर उत्पन्न निघण्याच्या काळात पूर्ण बदल झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असलेली कापसाची खरेदी तर केव्हाची बाद झाली आहे. यंदा तर कापूस निघण्याचे संकेतही दिसत नाहीत. कपाशीला मिळत असलेल्या अत्यल्प दारामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला आपली पसंती दर्शविली असून जिल्ह्यात सोयाबीनचचा पेरा वाढत आहे; मात्र यंदाच्या हंगामात सोयाबीनवर अनेक किड्यांनी हल्ला चढविला आहे. यात लष्करी अळीने केलेल्या हल्ल्यात सोयाबीनचे उत्पन्न होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सेवाग्राम येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची पुरती चाळणी झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने शेताकडे जाण्याचेही टाळले आहे. यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मिळण्याची कुठलीही आशा शिल्लक राहिली नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. या संकटातून मार्ग कसा काढावा या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी आहे.(वार्ताहर)