शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात १३ कोटी ७२ लाखांचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:00 AM

जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : ८ हजार १९८ लाभार्थींना नुकसानभरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा झाला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीट आणि यातूनही पीक वाचले तर किडीचा प्रादुर्भाव असतोच. त्यामुळे पीक घरी येईपर्यंत शेतकऱ्याला काहीच शाश्वती नसते. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली. गेल्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ८ हजार १९८ सोयाबीन उत्पादकांना या पीक विम्याने तारले आहे. या शेतकऱ्यांना १३ कोटी ७२ लाख १४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या  शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळाली आहे. मागील वर्षी कर्ज घेतलेल्या ८ हजार १०६ तर कर्ज न घेतलेल्या ४०५ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. यामध्ये ७ हजार २६६ हेक्टर क्षेत्र अंतर्भूत झाले होते. तर १ लक्ष ३०  हजार ९७५ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला नव्हता. विमा काढलेल्या ८ हजार ५११ शेतकऱ्यांनी ६५ लक्ष ४० हजार रुपये पीक विम्यापोटी भरले होते. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने १२ मंडळामध्ये झालेल्या पीक कापणी प्रयोगात सोयाबीनचे उंबरठा उत्पादन कमी आले. त्यामुळे ८ हजार १९८ शेतकऱ्यांना १३ कोटी ७२ लाख १४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे पाऊस आणि किडीमुळे पीक घरात न आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यामुळे थोडा तरी दिलासा मिळाला. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही त्यांना मात्र नुकसानीचा सामना करावा लागला.  

पूर्वी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा योजना बंधनकारक करण्यात आली होती. मात्र मागील वर्षीपासून ऐच्छिक केली आहे. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती