शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

By admin | Updated: June 11, 2014 23:28 IST

शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत.

वर्धा : शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यामळे शेतकरी व सामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा य आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी, वर्धा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सादर केले. निवेदनानुसार शेतीव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देवून २४ तास विद्यूत पुरवठा होणे आवश्यक आहे. वडनेर ते वडकी या २० कि़मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण अनुदान प्राप्त असून २०१२ पर्यंत तो पूर्ण करायचा होता. पण अद्यापही तो अपूर्ण व बिकट अवस्थेत असून अपघात व जीवितहानीचे प्रमाण सतत वाढत आहे. संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्याकरिता तात्काळ आदेशीत करून होणारी जीवितहानीसाठी टाळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. त्याचप्रमाणे हिंगणघाट ते पार्डी नगाजी रस्त्यावरील पूल खचलेला असून दळणवळण ठप्प आहे. तेव्हा पुल नव्याने त्वरीत दुरूस्त करावा, वडनेर ते तिर्थक्षेत्र आजनसरा मार्गाचे रूंदीकरण करून उत्तम दर्जाची सुधारणा करावी यासह विविध मागण्यांबाबत शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यासोबत निवेदन देतेवेळी चर्चा करण्यात आली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही करण्यात आली. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास १९ जून २०१४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर वडनेर गावानजिक रस्तारोको आंदोलन करण्यासंदर्भातही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, मुख्य सल्लागार प्रल्हाद तुराहे, संघटक जयंत कातरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, राहुल सोरटे, गजानन चिडे, हर्षद घोरपडे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)