लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : येथील नारा फाटा परिसरात समाजकल्याण सभापती निता गजाम यांच्या वाहनाने दुचाकी चालकाला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नारा फाटा येथे घडली. शंकर तेजराव गोरे (२०) रा. नारा असे जखमी युवकाचे नाव असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.पोलीस सुत्रानुसार, आज सकाळी सभापतीचे एमएच ३२ एएच १५५६ कमांकाचे वाहन त्यांना आणण्याकरिता कारंजा येथून आजनादेवी येथे जात होते. दरम्यान नारा फाटा येथे एमएच ३२ एन ७१११ क्रमांकाचा दुचाकी चालक शंकर तेजराव गोरे याला धडक बसली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले. त्यात शासकीय वाहनासोबत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. यात सभापतीच्या वाहनाचा चालक विजय कुकडे (५२) रा. वर्धा हे किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
समाजकल्याण सभापतीच्या वाहनाची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:44 IST
येथील नारा फाटा परिसरात समाजकल्याण सभापती निता गजाम यांच्या वाहनाने दुचाकी चालकाला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नारा फाटा येथे घडली.
समाजकल्याण सभापतीच्या वाहनाची दुचाकीला धडक
ठळक मुद्देयुवक गंभीर : नारा फाटा येथील घटना