शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

सहा गावांना वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या बनावटीची आणि मातीची आहेत.

ठळक मुद्दे४० घरांची पडझड : अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, नुकसानीच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नजीकच्या रसुलाबाद परिसरात वादळीवाºयासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे रसुलाबादसह बाºहा सोनेगाव, साटोडा, टेंभरी परसोडी, पाचोड, विरुळ या गावातील सुमारे ४० घरांची पडझड झाली आहे. यात सदर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून काहींच्या घरावरील टिनपत्रेच उडून गेली. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासून ढगाळी वातावरण असले तरी दुपारी १२ च्या सुमारास ऊन निकाल्याने अनेकांनी शेतीची वाट धरली. अशातच डोक्यावरील सुर्यनारायण पश्चिमेच्या दिशेने थोडा सरकताच वातावरणात बदल होत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या बनावटीची आणि मातीची आहेत. पावसादरम्यान सदर नुकसानग्रस्तांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. माहिती मिळताच रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, ग्रामविकास अधिकारी बोबडे, तलाठी भोले, कोतवाल अरुण हेंडवे, पोलीस पाटील श्याम काकडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. वृत्तलिहिस्तोवर नुकसान झालेल्या घरांची आकडेवारी जूळवणे सुरू होते. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे.नारा येथे वीज पडून पाच गार्इंचा मृत्यूकारंजा (घा.) - मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान नारा परिसरात वीज पडल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. यामुळे पशुपालकाचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी जनावर चारण्यासाठी नेण्यात आली. पाऊस सुरू झाल्याने जनावरांनी झाडाचा आधार घेतला. पण याच दरम्यान वीज पडल्याने झाडाखाली असलेल्या पाच गाई जागीच ठार झाल्या. सुदैवाने गुराखी घटनास्थळापासून दूर असल्याने तो थोडक्यात बचावला. वृत्तलिहिस्तोवर नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव कळू शकले नाही.१० शेळ्यांसह ११ कोंबड्या ठारवडनेर - वडनेर नजीकच्या गांगापूर गावात सोमवारी मुसळधार पावसादरम्यान घर कोसळले. यात १० शेळी व ११ कोंबड्या ठार झाल्या. यामुळे पशुपालक शंकर देवराव अलाम यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री वडनेर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. याच पावसादरम्यान शंकर अलाम यांनी चराई नंतर बकºया बांधलेल्या घराचा काही भाग कोसळला. या घरात कोंबड्याही होत्या. या अपघातात दहा बकऱ्यांसह ११ कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे शंकर अलाम यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. 

टॅग्स :Rainपाऊस