लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. परिणामी, अपघातात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेकांना गंभीर दुखापती होत आहे. असे असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.विठोबा चौकाकडून नागपूरकडे जाणाºया अत्यंत गजबजलेला तथा वाहतुकीचा रस्ता शहरात प्रवेश करतो. फीदा हुसैन पेट्रोल पंपकडून विठोबा चौकाकडे येताना प्रस्तूत प्रतिनिधीने खड्ड्यांची प्रत्यक्ष गणनाच केली. यात खड्डे विठोबा चौक ते पेट्रोलपंप दरम्यान रस्त्यावर लहान-मोठे ११३ खड्डे दिसून आले. या रस्त्याची दर्जेदार दुरूस्ती करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगर परिषद प्रशासनाने अद्याप दाखविली नाही. शहरातील अनेक नागरिकांनी मागणी करूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पाऊस आल्यास या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असून दुचाकी धारकांची फटफजीती होते. खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. विशेषत: महिला व वृद्ध दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य मार्गावर इतके अधिक खड्डे आहे की, रस्ताच खड्ड्यात गेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. खड्डे चुकवून चालण्याच्या नादात अपघात होतात. या रस्त्याचे नव्याने बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. असे असले तरी तोपर्यंत तात्पूरती दुरूस्ती करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुरूमावरून वाहने घसरून होत आहेत अपघाततुकडोजी चौक ते विठोबा चौक दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांत मुरूम टाकण्यात आला आहे. यात दगडच अधिक असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहे. खड्डे भरताना मुरूम पे्रसही करण्यात आलेला नाही. यापुर्वी हेच खड्डे गिट्टीच्या बारीक चुरीने बुजविण्यात आले होते; पण पहिल्याच पावसातच चुरी वाहून गेली. यानंतर थोडी जाड चुरी खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आली; पण ती निरुपयोगी ठरली आहे. खड्डे मात्र जैसे थे झाले आहेत.आता पालिकेने तिसरा प्रयोग म्हणून मुरूम व दगडाने खड्डे बुजविले आहे. त्या मुरूमाच्या दगडांवरून वाहने घसरून अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. शिवाय रस्त्यांची अवस्था पाहून पालिकेवर रोष व्यक्त करीत आहेत. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
पाण्यामुळे रस्त्याची झाली चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:30 IST
शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे.
पाण्यामुळे रस्त्याची झाली चाळणी
ठळक मुद्देविठोबा चौकातील प्रकार : दुरूस्तीकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे