शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

कोरियाच्या सात विद्यार्थ्यांचा सेवाग्राम आश्रमात मुक्काम

By admin | Updated: August 18, 2015 02:18 IST

शालेय अभ्यासक्रमात असलेले महात्मा गांधी यांचे विचार, रचनात्मक कार्यासह व भारतीय समाज, संस्कृती याची

सेवाग्राम : शालेय अभ्यासक्रमात असलेले महात्मा गांधी यांचे विचार, रचनात्मक कार्यासह व भारतीय समाज, संस्कृती याची माहिती घेण्याकरिता कोरिया येथील सात विद्यार्थी सेवाग्राम आश्रमात तीन दिवस मुक्कामी होते. या तीन दिवसात त्यांनी आश्रमात वास्तव्य करीत विविध विषयाची माहिती जाणून घेतली. ही माहिती जाणून घेत त्यांनी बापूंचे विचार देशाकरिता खरच प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या. कोरिया येथील इंडेलियोन या शाळेतील चार मुलं, तीन मुली आणि एक शिक्षिका नई तालीम समिती आणि महात्मा गांधी आश्रमता मंगळवार ते गुरुवारपर्यंत मुक्कामी होते. या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील भारतीय समाज व्यवस्था, संस्कृती आणि गांधी विचार दर्शनाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करावयाचा होता. याकरिता हे विद्यार्थी येथे आल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी नई तालीम समिती, गांधी आश्रम, गांधी चित्र प्रदर्शन, एमगिरी, मगन संग्रहालय, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, गीताई मंदिर, बौद्ध स्तूप, पवनार आश्रम आदी स्थळांना भेटी देत माहिती घेतली. नई तालीम समितीचे मंत्री प्रदीप दासगुप्ता यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधताना गांधीजीचे कार्य विचार आणि रचनात्मक कार्य याची माहिती देवून जगातील मानवी जीवनात बापूचे विचार किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले.विद्यार्थ्यांच्या दौऱ्यातील व्यवस्थापक म्हणून नागालँडचा तरूण होता. वर्धा दौऱ्याची व्यवस्था समितीचे मंत्री डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, समन्वयक प्रभाकर पुसदकर आणि व्यवस्थापक पवन गणवीर यांनी सांभाळली. त्यांना गांधींच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. (वार्ताहर)