शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत दराने सीसीआयला कापूस विक्री करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून जास्तीत जास्त १२ टक्के आद्रता असलेला कापूस स्वीकारण्यात येत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असणाऱ्या कापसाची खरेदी आर्द्रतेच्या टक्केवारीच्या प्रमाणात दरामध्ये कपात करून अधिकाधिक १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाची खरेदी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुधीर कोठारी : बाजार समितीत आयोजित पत्रकार परिषदेत केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापसाची विक्री न करता सीसीआयला आधारभूत दराने कापसाची विक्री करावी. तसेच बाजार समितीने शेतकरी, वाहनचालक व वाहनमालकांकरिता सुरू केलेल्या १ कोटी ११ लाखांच्या भाग्यशाली इनामी योजनेतसुद्धा समिती आवारात शेतमालाची विक्री करून सहभागी व्हावे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन हा शेतमाल सद्यस्थितीत विक्री करायचा नाही; मात्र, घरी साठवणुकीकरिता सुविधा नाही व पैशाची आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय कापूस निगम (सीसीआय) द्वारे ८ ते १२ टक्के आर्द्रतेच्या अटीवर ५ हजार ५५० ते ५ हजार ३२८/- या दराने कापसाच्या खरेदीची सुरुवात केली आहे.सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून जास्तीत जास्त १२ टक्के आद्रता असलेला कापूस स्वीकारण्यात येत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असणाऱ्या कापसाची खरेदी आर्द्रतेच्या टक्केवारीच्या प्रमाणात दरामध्ये कपात करून अधिकाधिक १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सुकलेला मालच विक्रीकरिता आणण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, सीसीआयला कापूस विक्रीच्या वेळेस शेतकऱ्याकडे सुरू वर्षाचा सात-बारा, आयएफएससी कोड व खाते नंबर असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स, आधारकार्ड व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे व माहिती आवश्यक आहे. सीसीआयकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती हरीश वडतकर, संचालक मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, शेषकुमार येरलेकर, उत्तमराव भोयर, ओमप्रकाश डालिया, विनोद वानखेडे, अशोक उपासे, राजेश मंगेकर, राजेश कोचर, सुरेश सातोकर, बळीराम नासर, बापूराव महाजन, सुरेश वैद्य, पंकज कोचर, संजय तपासे, संजय जैन, संजय कातरे, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे व सचिव टी.सी.चांभारे व मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी, अडते, वाहनचालक उपस्थित होते.सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असणाऱ्या कापसाची खरेदी आर्द्रतेच्या टक्केवारीच्या प्रमाणात दरामध्ये कपात करून अधिकाधिक १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सुकलेला मालच विक्रीकरिता आणण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी-अ‍ॅड. सुधीर कोठारीसभापती, कृउबास, हिंगणघाट

टॅग्स :cottonकापूस