वाळू भरलेले दोन टिप्पर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:22+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. अधिक विचारपूस दरम्यान ही वाळू चोरी लपीने वर्धा शहरात नेल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.

वाळू भरलेले दोन टिप्पर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : नजीकच्या भगवा शिवारातील नदी पात्रातून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्या आधारे हिंगणघाट तालुका प्रशासनाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत वाळू भरलेले दोन टिप्पर जप्त केले. सदर वाळू भरलेली वाहने वाळू माफिया प्रकाश गायकवाड आणि शेखर लुंगे दोन्ही रा. वर्धा यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. अधिक विचारपूस दरम्यान ही वाळू चोरी लपीने वर्धा शहरात नेल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव न झाल्याने आणि वाळूची चोरी केल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर ही दोन्ही वाळू भरलेली वाहने अधिकाऱ्यांनी जप्त केली. शिवाय आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे.