सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये गोंडस मुलीला दिला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:09 IST2018-11-15T12:08:27+5:302018-11-15T12:09:05+5:30
सिकंदराबाद येथून आपल्या मूळगावी जात असलेल्या महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि तिने रेल्वेगाडीत एका गोंडस मुलीला जनम्म दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये गोंडस मुलीला दिला जन्म
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सिकंदराबाद येथून आपल्या मूळगावी जात असलेल्या महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि तिने रेल्वेगाडीत एका गोंडस मुलीला जनम्म दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असलेल्या आठ महिन्याच्या गरोदर महिलेला वर्धा रेल्वे स्थानक येण्यापूर्वी प्रसुती कळा सुरू झाल्या. बघता-बघता रेल्वे गाडीतच सदर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याबाबतची माहिती वर्धा रेल्वे प्रशासनाला मिळताच ही रेल्वे गाडी वर्धेत थांबवून माता व नवजात मुलीला तातडीने रुग्णवाहिका बोलावून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मायादेवी श्यामसुंदर गुजर (२६) रा. मोहराई, ता. जयतारन, जि. पाली, राजस्थान असे महिलेचे नाव असल्याचे वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सांगितले.