शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध बांधवांची महामानवाला मानवंदना

By admin | Updated: April 15, 2016 02:33 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती

भीममय वातावरण : विविध वॉर्डावॉर्डातून निघालेल्या मिरवणुकांनी वर्धा दुमदुमले
वर्धा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून असंख्य आंबेडकरी जनतेनी महामानवाला अभिवादन केले. बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव जिल्ह्यात सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण आणि शांततेत पार पडला.
वर्धेसह जिल्ह्यातील काही शहरांमध्ये ‘जय भीम’चा नारा देत ‘जबतक सुरज चाँद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’च्या घोषणा देत निळे झेंडे व पंचशील ध्वज हातात घेऊन निघालेल्या बाईक रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या, तर सायंकाळी वॉर्डावॉर्डातून मिरवणुकीच्या माध्यमातून बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. याप्रसंगी वातावरण निळाईने व्यापून गेले होते. वर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर चौकातील पोलीस ग्राऊंड येथे सतत चार दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळपासूनच वर्धेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनेतेची रीघ लागली होती. रखरखते उन्हं असतानाही दिवसभर ही गर्दी कायम होती. दरम्यान, खा. रामदास तडस, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार व विवेक इलमे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. जयंती महोत्सवानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा चौकाला निळ्या पताकांनी आकर्षक सजविण्यात आले होते. पुतळ्याच्या चबुतऱ्याला निळ्या व पांढऱ्या फुग्यांच्या कमानी लक्षवेधत होत्या. सभोवताल विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटनाच्यावतीने आंबेडकरी जनतेसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. शहरातील मुख्य मार्गावर स्वागतद्वार आणि पताका लावल्याने शहरातील वातावरण भीममय झाले होते. सायंकाळी शहरातील व सभोवतालच्या गावांमध्ये निघालेल्या मिरवणुका डॉ. आंबेडकर चौकात एकवटल्या. हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. अनेकांनी मेणबत्ती लावून अभिवादन केले. उमेश म्हैसकर यांनी वैशाली नगरातून बाईक रॅली काढली. ही रॅली प्रबुद्ध नगरातून मार्गक्रमण करीत शहरातील मुख्य मार्गाने फिरवून डॉ. आंबेडकर चौकात दाखल होताच बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. या रॅलीत महिलावर्ग दुचाकीसह सहभागी झाल्या होत्या. रॅलीत निळे फेटे लावलेले भीमसैनिक लक्ष वेधून घेत होते.
दिवसभर शहरातील विविध भागातून भीमसैनिकांनी बाईक रॅली काढल्या. हातात निळे झेंडे घेऊन शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या बाईक रॅली विशेष आकर्षण ठरल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने चार दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. यासाठी उत्सव समितीचे संयोजक प्रमोद राऊत, समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके, महासचिव रत्नमाला साखरे, कोषाध्यक्ष सुरेंद्र पुनवटकर, सल्लागार समितीचे दिनेश सवाई, विजय आगलावे, निरज गुजर, डॉ. रवीदत्त कांबळे, अ‍ॅड. प्रेम ताकसांडे, शारदा झामरे, अतुल दिवे, अशोक खनाडे, अरविंद निकोसे, सफदर अली, अ‍ॅड. राजेश थुल, प्रकाश पाटील, अरविंद मेहरा, रवी जगताप, वसंत भगत. सोनू कांबळे, महेंद्र मुनेश्वर, उमेश जिंदे, बंटी गोस्वावी, मिलिंद ढाले, प्रवीण पोळके, जयकांत पाटील, रमेश जामलेकर, प्रवीण शेंडे, निशिकांत गोटे, दिनेश थुल, राहुल झामरे, अनिल खडतकर, विजय नगराळे, भास्कर भगत, धम्मपाल शंभरकर, प्रदीप भगत. प्रकाश कांबळे, शेख परवीन उपाध्यक्ष नितीश कुंभारे, बंडू फुलमाळी, पिंटू खंडारे, सलमान खान, सहसचिव सुरज बडगे, पंकज लभाने, अमित डांगे यांच्यासह राजू वैद्य, असिफ कुरेशी, प्रकाश कोरडे, संदेश भित्रे, धम्मा सेलकर, मंगेश सूर्यवंशी, दीपक कंजर, अहमद पठाण, आशिष सोनटक्के, संतीश इंगळे, कुणाल आगरकर, राहुल पिंपळकर, समाधान पाटील, सोनू सहारे, प्रशांत रामटेके, परवेज खान, सुमित गजभिये, संदीप नगराळे, विकास झंझाळ, बादल शेळके, अमर कांबळे, पप्पू लोहवे, विनय भगत, आनंद गायकवाड, चंदू डोफे, उमेश मेश्राम, आदित्य मांदाडे, अविनाश नागदेवे, अरविंद भगत, देवानंद तेलतुंबडे, अमोल थुल, मंगेश नगराळे, अक्षय फुलझेले, विशाल नगराळे, प्रणय ताकसांडे, प्रणित मानकर, आकाश पाझारे, मयूर डेकाटे, आशिष जांभुळकर, प्रशिल उके, अमरदीप कांबळे, चिंटु इंगळे, पंकज मून, राहुल पाटील, अभिनाथ वाघमारे, अमोल फुलझेले, आनंद गायकवाड, रमेश भगत, आकाश मंदाडे, जयशील पानबुडे, पवन धवमे, सिद्धांत मून, चिंटु गोटे, सौरभ होतोले व वैभव पाटील या सदस्यांनी हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मागील १५ दिवसांपासून अहोरात्र परिश्रम घेतले.(जिल्हा प्रतिनिधी)