शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पंचधारा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

सांडव्यावरून वाहनारे पाणी पर्यटकांना भुरळच घालत आहे. अशातच अनेक जण सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न बाळगता थेट पाण्याकडे जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिधोरा येथील पंचधारा धरणावर प्रत्येक दिवशी सध्या शेकडो पर्यटक भेट देत आहेत. रविवारीतर पर्यटकांचा मेळाच या ठिकाणी भरतो.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : नजीकच्या रिधोरा येथील पंचधारा धरणाची सुरक्षा सध्या वाºयावर असल्याचे दिसून येत आहे. हा परिसर जंगलव्याप्त आणि निसर्गरम्य असल्याने सध्या येथे पर्यटकही पावसासह धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. परंतु, पर्यटकांची मनमर्जी सध्या एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारी ठरत असून त्याकडे पाटबंधारे विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने रिधोरा येथील पंचधारा धरण १०० टक्के भरले आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. सांडव्यावरून वाहनारे पाणी पर्यटकांना भुरळच घालत आहे. अशातच अनेक जण सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न बाळगता थेट पाण्याकडे जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिधोरा येथील पंचधारा धरणावर प्रत्येक दिवशी सध्या शेकडो पर्यटक भेट देत आहेत. रविवारीतर पर्यटकांचा मेळाच या ठिकाणी भरतो. निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी येणारे अनेक पर्यटक सध्या मोठा धोका पत्कारून धरणाच्या पाण्यात पोहताना दिसतात. कुणीही धरणाच्या पाण्यात उतरू नये असे पाटबंधारे विभागाच्यावतीने वेळोवेळी सांगितल्या जात असले तरी येथे त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात आहे. इतकेच नव्हे तर या धरणावर धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात तरुण मंडळीही येत आहेत. त्यांच्याकडून पाण्यात उतरुन सेल्फी काढण्याचेही प्रकार येथे होत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता या ठिकाणी प्रभावी उपाय योजना करण्याची मागणी आहे. 

टॅग्स :Damधरण