शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी

By admin | Updated: May 16, 2017 01:13 IST

मालवण पॅटर्न प्रमाणे ३ कोटी रुपये खर्चून सुसज्ज उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी ठरत आहे.

तीन कोटींचा खर्च वाया: कर्मचारी भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अमोल सोटे। लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : मालवण पॅटर्न प्रमाणे ३ कोटी रुपये खर्चून सुसज्ज उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी ठरत आहे. येथे गत तीन वर्षांपासून एकही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिला नाही. लोकप्रतिनिधी देखील डोळ्यावर पट्टी बांधून असल्याचे दिसते. यामुळे ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.२५ हजार लोकसंख्येचे आष्टी शहर, त्यालाच लागून ६ हजार लोकसंख्याचे नवीन आष्टी व पेठअहमदपूर या दोन गावांचा संबंध. यासह तालुक्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सन २००९ साली २१ खाटांचे ग्रामीण रुग्णालय राज्य शासनाने मंजूर केले. बांधकामही लवकर झाले. मात्र याठिकाणी एकही आस्थापना देण्यात आली नाही. प्रत्येक सभेत जिल्हा शल्यचिकित्सक सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून कारभार सुरू आहे ना, अशी समजूत काढतात. नंतर कर्मचारी देवू असे सांगतात.आर्वी विधानसभा मतदार संघात आष्टी तालुक्याच्या राजकारणावर सर्व काही विसंबून आहे. येथील आजी-माजी आमदार विकासकामासाठी चढाओढ करतात. मग ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी का धडपड करीत नाही, असा सवाल सर्वसामान्यांचा आहे. डझनभर पुढारी मीपणा मिरवितातजनतेच्या सेवेसाठी शासनाला जाग आणण्याचे काम का करीत नाही. नुसतेच वाद घालत बसण्यापेक्षा समाजोपयोगी कामे करण्याची अपेक्षा गावकरी करीत आहेत. ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करा. अन्यथा आष्टीकर लोकप्रतिनिधी आणि शासनाला धडे शिकविल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे!