रोखसह मौल्यवान साहित्य पळविणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:07 IST2018-12-20T22:07:23+5:302018-12-20T22:07:48+5:30
शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली.

रोखसह मौल्यवान साहित्य पळविणारे जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शाहीद अकरम खान (४५) रा. गाडगेनगर, म्हसाळा हे आपल्या मित्रासह दुचाकीने राळेगाव येथील दर्ग्यावरून कापसी मार्गे वर्धेकडे जात असताना कात्री फाट्याजवळ मागाहुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी इंडिका गाडीने ओव्हरटेक करून गाडी आडवी करीत मोटारसायकल थांबवीली. त्यानंतर अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळील रोख मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची तक्रार अल्लीपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला आहे.
आरोपींनी कारने येत अकरम खान यांच्यासह त्यांच्या मित्राला मारहाण करून रोख १ हजार ३०० रुपये व ३५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत गुलाब बोरकर (३७), विलास सुधाकर सेलकर (३१) व विनोद श्यामराव ढोले (४४) सर्व रा. सिरसगाव यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार व चोरीचे साहित्य असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, महेंद्र इंगळे, अशोक साबळे, राजेंद्र ठाकूर, दिनेश कांबळे, परवेज खान, रामकृष्ण इंगळे, कुलदीप टांकसाळे, भुषन पुरी यांनी केली.