शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

रेती वाहतुकीसाठी नदी पात्रात रस्ते

By admin | Updated: March 21, 2017 01:18 IST

जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले.

नियमांना बगल : नैसर्गिक पात्र बदलण्याचा धोकावर्धा : जिल्हा प्रशासनाकडून रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. हे लिलाव शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून करण्यात आले. शिवाय घाटधारकांनीही नियमांचे पालन करीत रेतीचा उपसा व वाहतूक करावे, असे निर्देश देण्यात आले; पण कुठेही नियमांचे पालन होत नाही. वडगाव (पांडे) घाट क्र. एक येथे नदी पात्रातच वाहनांसाठी रस्त्यांची निर्मिती केली आहे. परिणामी, वर्धा नदीचे पात्रच धोक्यात आले आहे.आठ तालुक्यांमध्ये वर्धा, यशोदा, वणा आदी नदीपात्रातील अनेक रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. यातील वाळू उपस्यासह वाहतुकीकरिता काही नियम देण्यात आले; पण बहुतांश घाटांवर नियमांची पायमल्ली होत आहे. घाटांतून वाळूची वाहतूक करण्याकरिता थेट नदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रात रस्ते तयार करून नदीच्या दोन्ही बाजूला रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. रस्त्यांची निर्मिती करताना पात्रातीलच रेतीचा वापर होतो; पण त्यामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यांमुळे नदीचे पात्र बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडगाव (पांडे) येथील घाट क्र. एक व दोनचे लिलाव झालेत. या घाटांवर जाण्याकरिता वडगाव गावाच्या रस्त्याचा वापर होतो. परिणामी, रेतीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अल्पावधित दुरवस्था होते. सध्या शासनाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; पण रस्त्यावर डांबर कमी आणि आॅईलचे प्रमाणच अधिक दिसते. यामुळे रेतीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याचीही अल्पावधीतच वाताहत होणार, असे दिसते. शिवाय नदीपात्रापर्यंत ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर ही वाहने नेली जात आहे. परिणामी, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वडगाव (पांडे) येथे तर खड्डेमय रस्ता समतल करण्यासाठी एक जेसीबीच घाटधारकाने ठेवला आहे. या जेसीबीद्वारे रस्ता समतल केला जातो. यामुळे ग्रामस्थांतूनही ओरड होत नसल्याचे दिसून आले. या प्रकारातून रेती उपसा आणि वाहतुकीच्या नियमांची मात्र धूळधान केली जात असल्याचेच पाहावयास मिळते. जिल्हा प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कालव्याच्या भिंतीवरून होते जड वाहतूकआर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर), वडगाव शिवारात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कालव्याच्या भिंतीवरून केली जात असल्याचे निदर्शनास आले. यात वाळू भरलेले ट्रक तसेच ट्रॅक्टरही कालव्याच्या भिंतीवरूनच धावत असल्याने कालव्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरा पर्यायी रस्ता करण्याऐवजी हा प्रकार सर्रास घडणारा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणाराही ठरत आहे.वाहने फसून होतात अपघातनदीच्या पात्रातच रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असल्याने जड वाहने थेट पात्रात शिरत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रेती भरल्यानंतर वाहने काढण्याचा प्रयत्न केला जातो. हे करीत असताना अनेकदा ट्रॅक्टर फसतात. परिणामी, अपघातांना सामोरे जावे लागते. निमगव्हाण घाटावर असा अपघात झाला. तत्पूर्वी एका घाटात पोकलॅण्ड पात्रात बुडाला. या घटनांमुळे चालक, मजुरांना जीव गमवावा लागतो. असाच रेती भरलेला ट्रॅक्टर वडगाव एकमध्ये पात्रात फसून असल्याचे दिसून आले.