शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

कोटींच्या रस्त्याचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

ऑक्टोबर २०१६ हा काम सुरू करण्याचा दिनांक होता. काम सुरूही झाले. धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंतचे रस्ता बांधकामात नियोजनाच्या अभावात पूर्णत्वास गेले. या बांधकामात कंत्राटदाराने प्रचंड अनागोंदी कारभार केला.

ठळक मुद्देपावडे चौक-धंतोली : बांधकाम विभागही मौन बाळगून

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील चार वर्षांपासून पावडे चौक ते धंतोली चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण रखडले आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून कुठल्याही हालचाली नाहीत. हे काम कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.धुनिवाले चौक ते आर्वी नाका- पावडे चौक-धंतोली चौकापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला आणि सिमेंटीकरणाला मंजुरी मिळाली. याकरिता २५ कोटींचा निधी मंजूर झाला. मुंबई येथील जे पी. एंटरप्रायजेस कंपनीला बांधकामाचा कंत्राट मिळाला. रस्त्याचे चौपदरीकरण, सिमेंटीकरण, सिमेंट नाली बांधकाम, दुभाजक आणि फुटपाथ बांधकाम आदी कामांचा यात समावेश होता.ऑक्टोबर २०१६ हा काम सुरू करण्याचा दिनांक होता. काम सुरूही झाले. धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंतचे रस्ता बांधकामात नियोजनाच्या अभावात पूर्णत्वास गेले. या बांधकामात कंत्राटदाराने प्रचंड अनागोंदी कारभार केला. बांधकामात अनेक ठिकाणी सिमेंटचा नाममात्र वापर केल्याने बांधकामानंतर अल्पावधीतच पॅचिंग करण्याची नामुष्की ओढवली. तर बॅचलर रोडवर बांधकामादरम्यान नालीवरील स्लॅब कोसळला. त्यामुळे कामाच्या दर्जाविषयी नागरिकांशी प्रश्न उपस्थित केला. आर्वी नाका चौकात अनेकांच्या अतिक्रमणाला अभय देत ते न काढताच बांधकामाचा घाट घालण्यात आला. मात्र, कंत्राटदाराने न जुमानता अधिकारी, लोकप्रतिनिधींशी असलेल्या लागेबांध्यामुळे बांधकाम सुरूच ठेवले. आज अतिक्रमणामुळे आर्वी नाका चौकातील वळणावर रस्ता निमुळता झालेला आहे.पावडे चौकापर्यंत रस्ता बांधकाम पूर्णत्वास गेले असून चार वर्षांपासून धंतोली चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. काम पूर्णत्वास गेले नसताना कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने देयकही अदा केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. या रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी, धंतोली चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम तातडीने पूर्णत्वास नेण्याची मागणी होत आहे.फलकावरील माहिती पुसलीकामाच्या माहितीचा फलक धंतोली चौकात लावण्यात आला आहे. चार वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. फलकावर नमूद केलेली माहिती ठळकपणे नागरिकांना दिसू नये याकरिता निळ्या रंगाने ही माहिती पुसण्याचा प्रताप करण्यात आला आहे.त्यामुळे या मार्गाचे काम पूर्णत्वास जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता कामाचा कंत्राट आणि निविदा ही धंतोली चौकापर्यंत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा निधी गडप तर केला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे संबधित विभागही जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.