शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सर्वदूर रिमझिम पाऊसधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST

यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.

ठळक मुद्दे१४.८२ मिमी पाऊस : निम्न वर्धा प्रकल्पाची दो दारे उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारीही सकाळपासून रिमझिम पावसाने सुरुवात केली. यामध्ये जिल्ह्याभरातील आठही तालुक्यामध्ये सरासरी १४.८२ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसाने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प ७३.७१ टक्के भरल्याने या प्रकल्पाची दोन गेट १० से.मी. उघडल्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.सध्या सर्वत्रच समाधान कारक पाऊस असल्याने पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पाऊसधारांनी दुपारी तीन वाजताच उसंत घेतल्याने जनजीवन सुरळीत झाले. सततच्या पावसामुळे बऱ्याच भागातील शेतीकामांना ब्रेक लागला आहे. आकाशात ढगांची गर्दी कायम असून दमदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.सध्या जिल्ह्यातील ११ मोठ्या जलाशयापैकी पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्प तसेच २० लघू व मध्यम जलाशयांपैकी आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी व रोठा दोन या सहाही जलाशयाच्या सांडव्यावरुण पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौदर्य बघण्यासाठी या कोरोनाकाळात त्रस्त झालेल्या नागरिकांची गर्दी उसळत आहे. काही पोहोण्याचाही आनंद लुटत आहे पण, त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.लघु, मध्यम जलाशयांची पाणीपातळी वाढलीजिल्ह्यातील २० लघू व मध्यम जलाशय असून पावसामुळे पाणीपातळीत चागलीच वाढ झाली आहे. आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२ व परसोडी ही जलाशये ९० टक्के पेक्षा अधिक भरलेली आहेत. तर लहादेवी, रोठा-१ व कन्नमवारग्राम या तीन जलाशातील पाणीपातळी ८० टक्के पेक्षा जास्त असून कवाडी, सावंगी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, कुऱ्हा, आष्टी, पिलापूर, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या जलाशयातील पाणी पातळी ८० टक्केच्या आत आहे.

टॅग्स :Rainपाऊस